संभाजीनगर : शिवसेना उपशहरप्रमुख मुकेश खिल्लारे यांनी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, 7 डिसेंबर रोजी क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते. या स्पर्धेला परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. युवकांना सकारात्मक वाटचाल, क्रीडा संस्कार आणि संघभावनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, असे आयोजक मुकेश खिल्लारे यांनी सांगितले.
स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासूनच सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मैदानावर गर्दी उसळली असून विजयी संघाला ट्रॉफी व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
अंबादास दानवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा उपक्रमामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांनी सर्व सहभागी खेळाडू व प्रेक्षकांचे आभार मानले. याप्रसंगी उपशहरप्रमुख नितीन पवार व प्रकाश कमलानी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment