रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची संभाजीनगर येथील सभा उधळण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रचंड गोंधळ घालण्यात आला. यावेळी उपस्थितांमधून काहींनी तुफान घोषणाबाजी केली. तसेच कार्यक्रम स्थळावरील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन शांततेत साजरा करण्याचे आश्वासन शहरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी प्रचंड गदारोळ सुरू झाला


No comments:
Post a Comment