स्वस्त धान्य मार्गदर्शन शिबीराचे आज आयोजन
प्रतिनिधी
नांदेड, दि. 15 सप्टेंबर -
स्वस्त धान्य काळ्या बाजारावर आळा बसावा तसेच गरीबांना धान्य किती मिळते
याची माहिती हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहरातील शिवाजीनगर येेथे
आज दि. 16 सप्टेंबर रोजी स्वस्त धान्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात
आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मो. रफिक
उर्फ मुश्शीभाई यांनी केले आहे.
गोर-गरीब लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी शासनाकडून
स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वाटप करण्यात येते. परंतु काळ्या
बाजाराचे प्रमाण पाहता हे धान्य गरीबापर्यंत पोहचत नाही. तर
लाभार्थ्यांना देखील आपल्याला किती धान्य मिळते याची माहिती नाही. गरीब
लाभार्थ्यांना मंजूर धान्याची माहिती मिळावी यासाठी शहरातील शिवाजीनगर
पोलीस स्थानकासमोर मखदुम नगर येथे स्वस्त धान्य मार्गदर्शन शिबीराचे दि.
16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या
शिबीरात लाभार्थ्यांच्या शिधा पत्रिकेच्या आर. सी. क्रमाकावरुन
लाभार्थ्यांना मंजूर धान्याची माहिती देण्यात येणार आहे. या शिबीरास काही
कारणामुळे उपस्थित राहू न शकणार्या लाभार्थ्यांनी 8788681516 या मो.
क्रमाकावर आर. सी. क्रमांक व्हाट्सऍप केल्यानंतर माहिती पाठविण्याची
सुविधा देण्यात येणार असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या मार्गदर्शन
शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मो. रफिक उर्फ
मुश्शीभाई, जावेद शेख यांनी केले आहे

No comments:
Post a Comment