#नांदेड_जिल्ह्यात_मुग_उडीद_खरेदी_केंद्र_सुरू_करा
व्यापार्यांकडुन हमीभावाच्या निम्या दरात मुग- उडीद खरेदी
नांदेड/प्रतिनिधी- यंदाची खरीपाची पिके चांगली झाली असुन मुग- उडीद बाजारात येत आहेत. शासनाने ठरवुन दिलेल्या हमीभावाने खरेदी करण्यास व्यापारी तयार नसल्याने निम्या कींमतीत विकावे लागत आहेत. त्यातून होत असलेली शेतकर्यांची आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी शासनाने सर्व तालूक्याच्या ठिकाणी मुग- उडीद खरेदी केन्द्रे सुरु करावीत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तिडके यांनी केली आहे.
शासनाने पिकांचे हमीभाव जाहीर करुन शेतकर्यांना दिलासा दिला आहे. परंतु व्यापारी शासनाच्या हमीभावाने खरेदी करण्यास तयार नाहीत. शासनाच्या हमीभावाच्या अर्ध्या कींमतीत शेतकर्यांचा माल खरेदी केला जात आहे. सणासुदीचे दिवस असल्याने नाईलाजाने मुग व उडीद प्रति क्विंटल 3 हजार 500 रुपयांनी विक्री करावा लागत आहे. त्यामुळे कर्जाच्या खाईतून बाहेर येत असलेला बळीराजा योग्य कींमत मिळत नसल्याने पुन्हा कर्ज बाजारी होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या हमीभाव शेतकर्यांना मिळवुन देण्यासाठी शासनाचे खरेदी केन्द्र सुरु करण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ जिल्ह्यातील सर्व सोळा तालुक्यात मुग व उडीद हमीभावाने खरेदी केन्द्रे चालु करावीत अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशार प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहेे.
या निवेदनावर प्रहार जिल्हा प्रमुख उमाकांत तिडके पाटील, शिवाजी पावडे प्रितपालसिंघ शाहु, कपिल पाटील भोजने, शिवाजीराव देशमुख, अजय हानवते, गोपाळ पावडे, , संतोष कदम, गोविंद पावडे, पंकज पावडे, साईनाथ दर्यापुरकर, शाम इंगाले, सखाराम पावडे, भिमराव पाटील धानोरेकर, सरपंच सतोश भरकड शिवाजी बोढारे आवधुत तिडके दयानद तिडके सभा तिडके भगवान शिरसागर ज्ञानेश्वर धुर्वे यांच्या स्वाक्षर्या आहेत

No comments:
Post a Comment