व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 14 September 2018

शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी केंद्र शासनाच्‍या पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाच्‍या वतीने देशभरात दिनांक 15 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीमध्‍ये स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान



शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी केंद्र शासनाच्‍या पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाच्‍या वतीने देशभरात दिनांक 15 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीमध्‍ये स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्‍यात येणार असून या अभियानात जिल्‍हयातील नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपले गाव, शाळा-अंगणवाडी व परिसर स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी केले आहे.
     आज शुक्रवार दिनांक 14 सप्‍टेंबर रोजी जिल्‍हा परिषद परिसरात स्‍वच्‍छता ही सेवा या विशेष अभियानाचा जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ करण्‍यात आला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी साहेबराव कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.व्‍ही. शिंगणे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सौ. व्‍ही.आर. झिने, उप मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शेखर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमान उंचाविण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने विविध अभियान राबविण्‍यात येतात. लोकसहभाग ज्‍या गावात मिळाला त्‍या गावांचा कायापालट झाला आहे. स्‍वच्‍छता ही सेवा या विशेष अभियानातून गावस्‍तरावर स्‍वच्‍छते विषयी मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येणार आहे. गावस्‍तरावर शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी नाग‍रीकांनी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
     यावेळी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी स्‍वच्‍छतेची शपथ घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांनी केले. यावळी जिल्‍हा परिषद कर्मचारी युनियनचे रज्‍य कार्याध्‍यक्ष बाबूराव पूजरवाड, आरोग्‍य औषध निर्माण संघनेचे महाराष्‍ट्र राज्‍य अध्‍यक्ष अविनाश देशमुख, अशोक मोकले, बालाजी नागमवाड, संतोष मठपती, प्रल्‍हाद थोरवटे, चालिकवार, विशाल कदम, नंदलाल लोकडे, अल्‍केश शिरशेटवार, महेंद्र वाठोरे, प्रविण पाटील, विठ्ठल चिगळे, कृष्‍णा गोपीवार, सुशिल मानवतकर, मधुकर मोरे, गणेश अंबेकर, रुपेश पाटील, सुनिल कदम, वाय.एन. तुमेदवार, व्‍ही.आर. सुवर्णकार यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
चौकट
गावागात महाश्रमदान; शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांचाही सहभाग- सिईओ काकडे
     आज शनिवार दिनांक 15 सप्‍टेंबर रोजी स्‍वच्‍छतेची शपथ घेवून स्‍वच्‍छता ही सेवा या विशेष अभियानाची सुरवात करण्‍यात येणार आहे. यात स्‍वच्‍छ, आरोग्‍यपूर्ण आणि नाविन भारताच्‍या निर्मितीसाठी पूर्ण निष्‍ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्‍थळी स्‍वच्‍छता ठेवण्‍याचा संकल्‍प केला जाणार आहे. अशी माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे.
    विविध माध्‍यमांतून ग्रामस्‍थांमध्‍ये जनजागृती करण्‍यासोबत पाण्‍याचे स्‍त्रोत तसेच सार्वजनिक परिसर स्‍वच्‍छ करण्‍यात येणार आहे. स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान दिनांक 2 ऑक्‍टोंबर 2018 पर्यंत चालेल. यात दिनांक 15 व 16 सप्‍टेंबर रोजी जागरुकता अभियान, दिनांक 16 ते 30 सप्‍टेबर दरम्‍यान शौचालय निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापन, श्रमदान  व समग्र स्‍वच्‍छता तर दिनांक 2 ऑक्‍टोंबर महात्‍मा गांधी जयंती हा दिवस स्‍वच्‍छ भारत दिवस म्‍हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी तालुका व गावस्‍तरावर महाश्रमदान तसेच स्‍वच्‍छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यासाठी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, सर्व विस्‍तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी योग्‍य नियोजन करुन शासनाने ठरवून दिलेल्‍या वेळापत्रकानुसार उपक्रम राबवावेत असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment