एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवडयात नांदेड येथे पासपोर्ट कार्यालय
नांदेड दि.26 मार्च. नांदेड येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी शहर काँग्रेसचा प्रवक्ता मुन्तजीबोद्दीन यांनी खा.अशोकराव चव्हाण यांचेकडे निवेदनाव्दारे मागील वर्षी केली होती. या निवेदनाच्या संदर्भ देऊन नांदेड येथे मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठविले होते व पासपोर्ट सेवा केंद्र नांदेड येथे लवकरच सुरु व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले असून एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवडयात मुख्य पोस्ट ऑफीस येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ता मुन्तजीबोद्दीन यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालय व पोस्ट कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने पी.ओ.पी.एस.के. मागील वर्षापासून देशातील विविध शहरात सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सात जिल्हयात पी.ओ.पी.एस.के. मंजुर झाले होते. आता मार्च महीन्यात जालना, बीड, अहमदनगर येथील पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालय येथे पी.ओ.पी.एस.के. अर्थात पासपोर्ट सुविधा केंद्र एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवडयात सुरु होणार आहे. या सुविधेमुळे नांदेड जिल्हयातील अर्जदारांना पासपोर्ट करीता पुणे येथे जाण्याची गरज राहणार नाही.
नांदेड येथील पोस्ट कार्यालयातील दोन अधिकारी यांनी 19 ते 23 मार्च पर्यंत प्रशिक्षण घेऊन आले आहे. पुणे पासपोर्ट कार्यालयातील दोन अधिकारी नांदेड येथे पासपोर्ट सुविधा केंद्रात राहणार आहेत. अर्जदारांना ऑनलाईन फॉर्म दाखल केल्यानंतर अपायमेंटची तारखेनूसार पासपोर्ट सेवा केंद्र, नांदेड येथे मुळ कागदपत्रासह हजर राहावे लागणार आहे. येथे कागदपत्रांची पडताळणी, फिगंर प्रिंट फोटो काढण्याचे काम केले जाईल व नंतर पोलीस पडताळणी होईल व अर्जदाराला पासपोर्ट त्याच्यावर पत्तावर येईल. यामुळे त्यांना विभागीय पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे जाण्याची गरज राहणार नाही.
नांदेड पोस्ट विभागाचे अधिक्षक एस.एम.अली यांनी याबाबत दुजोरा देऊन सांगितले की, पासपोर्ट सेवा केंद्रासाठी हॉल तयार करण्यात आला आहे. परीसरातील रंगरगोटी व इतर काम पुर्ण झाले असून पुणे कार्यालयातून आदेश प्राप्त झाल्यानंतर अपायमेंटची तारीख जाहीर करुन रीतसरप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पुढच्या आठवडयात करण्यात येईल.

No comments:
Post a Comment