शिवसेना राज्य ग्रंथालय सेल कार्यकर्त्याचा पहिला मेळावा व श्री. हेमंत पाटील मंत्री यांचा सत्कार व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप नऊ आक्टोबर रोजी मुंबई येथे होत असल्याचे माहिती बी. जी. देशमुख अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशमुख यांनी अधिकची माहिती देताना सांगितले राज्यात 11,700 शासनमान्य संधान कार्यरत आहेत. या वाचनालयांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात गरजू वाचकांना व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्र व ग्रंथ मोफत वाचण्यासाठी शासन उपलब्ध करून देत असते. या योजनेमुळे दरवर्षी हजारो मुले मुली स्पर्धा परीक्षेत पास होत आहेत.
2012 ते 2022 तब्बल 11 वर्षे मागच्या सरकारने या चळवळीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही चळवळ डबघाईस आली आहे.
अल्पशा मानधनावर काम करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. वाढत्या महागाईमुळे दर्जेदार ग्रंथ वाचकांना देणे अशक्य झाले आहे. ही बाब शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी मा.ना.श्री. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली असता मिळणाऱ्या अनुदानात तातडीने 60% वाढ मंजूर केली आहे.
या चळवळीकडे श्री. शिंदे साहेबांनी व शिवसेना पक्षाच्या मंत्रीमहोदयांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यांचे प्रमुख कारण मराठी भाषा वाचनसंस्कृती टिकवणे ती वाढविणे शिवसेना पक्षाचा प्रमुख अजेंडा आहे.
राज्यातील 11,700 शासनमान्य ग्रंथालय हा अजेंडा राबवत आहेत याकडे अधिक लक्ष देता यावे या हेतूने मा. श्री. हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचा पहिला मेळावा येत्या 9 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होत आहे.
याचे उद्घाटन मा. श्री. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मा. श्री. उदय सामंत उद्योग मंत्री तथा माजी उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) मंत्री यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मा. श्री. दीपक केसरकर (मराठी भाषा मंत्री), मा. श्री. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री), मा. श्री. दादाजी भुसे (सार्वजनिक बांधकाम मंत्री), मा. श्री. राजेश क्षीरसागर (मंत्री दर्जा), श्री संजयजी मोरे (सचिव), श्री आनंदरावजी पाटील (मराठवाडा संपर्क प्रमुख), डॉ. राजू वाघमारे (प्रवक्ता शिवसेना), आमदार यामिनी जाधव, आमदार भावना गवळी, श्री प्रशांत पालांडे (संपर्कप्रमुख), श्री विजय नाहटा (L.A.S. सेवानिवृत्त अधिकारी), श्री बाबुराव कदम कोळीकर (शिवसेना जिल्हाप्रमुख), माजी आमदार राम पांडागळे इत्यादींच्या उपस्थितीत हा मेळावा 'नंदनवन' मुख्यमंत्री यांचा बंगला, मलबार हिल येथे 9 ऑक्टोबर रोज बुधवार दुपारी 4 वाजता होत आहे. यावेळी ऑक्टोबर 2012 आघाडी सरकारने ग्रंथालय चळवळीच्या विकासाला स्थगिती देण्यारया निर्णय व या स्थगितीला महामहीम राज्यपाल महोदयांनी ऑगस्ट 2022 रोजी सदर स्थगिती उठवल्यामुळे चळवळीच्या न्याय्य मागण्या पदरात पाडण्याचे दरवाजे युती सरकारमुळे सुरू झाली आहेत. लवकरच प्रमुख आर्थिक मागणी श्री. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री करतील असा
विश्वास या संघटनेचे नेते बी.जी. देशमुख यांनी व्यक्त केला...
या वेळी यांच्यासह कोरकमिटी पदाधिकारी महंत प्रभाकर कपाटे महाराज, राजेश मोरे, रमेश कांबळे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment