देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या सूचनेनुसार 'गाव चलो अभियान' संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या गाव_चलो_अभियानाच्या माध्यमातून डॉ सचिन संभाजी पाटील उमरेकर (सहसंयोजक: भाजपा वैद्यकीय आघाडी,महाराष्ट्र राज्य तथा सिनेट सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) व अनिल हजारी नांदेड महानगर सह सयोजक गाव चलो अभियान प्रमूख यांनी कारेगाव ता.लोहा जि.नांदेड येथे गावातील मारोती मंदिर इथे पुष्पहार अर्पण करून जय श्री राम चा नारा देत गाव चलो अभियाना सुरवात केली.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे लाभार्थी,जेष्ठ मंडळी,महिला भगिनी, संत मंडळी,नवीन मतदार यांचे भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनेचा लाभर्थी यांच्या घरी भेट दिली व गावातील जे कामे झाली आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली नवीन येणाऱ्या शासनाच्या योजने बद्दल माहिती दिली व समस्त कारेगावकऱ्यांना पुन्हा एक वेळेस येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली तसेच सायंकाळी संत मोतीराम महाराज यांच्या समाधी स्थळी भजना मध्ये सहभाग घेतला व गावात जेवण करून लाभार्थी यांच्या इथे मुक्काम केला.
गाव चलो अभियान यशस्वी करण्यासाठी कारेगाव येथील बूथ प्रमूख रामेश्र्वर पाटील किरवले,सरपंच शाम पाटिल किरवले, मा.सरपंच रावसाहेब पाटील किरवले, दिलीप पाटील किरवले, तंटा मुक्ती अध्यक्ष अशोक मोरे,गंगाधर दिगे , किशन मोरे व समस्त गावकरी मंडळी
#गाव_चलो_अभियान

No comments:
Post a Comment