व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 9 February 2024

भाजपाचे गाव चलो अभियान ; सौ.प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांचा दापशेड मुक्काम



 भाजपाचे गाव चलो अभियान सुरू असून लोहा तालुक्यातील दापशेड येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी गाव चलो अभियानांतर्गत मुक्काम केला.यावेळी त्यांनी विविध घटकांतील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजना व दहा वर्षात भारत देशाने केलेली प्रभावशाली प्रगती यावर नागरिकांशी त्यांनी भाष्य केले.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सूचनेनुसार 'गाव चलो अभियान' संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.राज्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यात हे अभियान अतिशय जोमाने सुरू आहे.पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील दापशेड येथे गुरुवारी (८ फेब्रुवारी) मुक्कामी होत्या.यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी,जेष्ठ मंडळी,महिला,पुरुष,तरुण-तरुणी,प्रयोगशील शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते,बचत गट,बूथ प्रमुख,पन्ना प्रमुख,अंगणवाडी ताई,शिक्षक,शिक्षिका,भाजपा महायुतीचे कार्यकर्ते,देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांशी भेटी-गाठी घेऊन त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला.आणि त्याच्या समस्या जाणून घेतल्या व विविध धार्मिक सामाजिक स्थळी भेट देत  केंद्र सरकार,राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आणि भिंती लेखन पत्रक मोहिमेत सहभागी झाल्या.प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व गाव चलो अभियानास सुरुवात झाली.संत सावता माळी देवस्थान,श्री विठ्ठल रुक्मिणी,सावता माळी,श्री हनुमान,श्री दत्त प्रभू यांचे दर्शन घेतले.तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ह.भ.प. उत्तम महाराज पालीमकर यांचे किर्तन श्रवण केले.गावकऱ्यांनी तिसरी बार मोदी सरकार असा एकजुटीने नारा दिला. प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांचा नेहमीच या भागात येणे असते त्यांनी मुक्कामी असल्यामुळे गावातील अगदी लहान पासून ते थोरांपर्यंत नागरिकांमध्ये आनंदी उत्साही भाजपामय वातावरण तयार झाले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पा.शिंदे,सरपंच सोनिया गजले,उपसरपंच गिरजाबाई राजूरे,यादवराव टोनगे,वीरभद्र राजुरे,विष्णू मोरे,गोविंद होळगे,भास्कर टोणगे,दलित सोनकांबळे,पंडित गजले,बाबुराव सोनवणे यांच्यासह गावकरी मंडळी मोठया संख्यने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment