नांदेड(प्रतिनिधी)-देशात धर्मांद व संविधान विरोधी शक्ती प्रचंड प्रबळ झाली असतांना अशा वेळी पुरोगामी डॉ.शंकरराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपाच्या दबावाला बळी पडून कॉंगे्रस पक्षाचा राजीनामा दिला. ज्या विचारधारेने दोन पिड्यांपासून नांदेडकर चव्हाण कुटूंबियांसोबत होते. यात संविधानवादी, आंबेडकरवादी, मुस्लीम व अल्पसंख्याक लोकांच्या पाठीत खंजीर अशोकराव चव्हाण घालतील अस कोणालाही वाटल नव्हत. हा आरएसएस भाजपासारख्या धर्मांद शक्ती देशाच संविधान बदलू पाहत आहे. अशा वेळी देशातील सर्व भ्रष्ट राजकारणी लोक ईडीच्या दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश करून घेत आहेत. स्वत:चा भ्रष्टाचार व आदर्श पाप लपविण्यासाठी सर्व जनतेला वाऱ्यावर सोडून अशोक चव्हाण भाजपवासी होत आहेत. धर्मांद शक्तीच्या कळपामध्ये सामील होण्यापेक्षा त्यांनी राजकीय सन्यास घेतला असता तर त्यांचा जास्त आदर वाटला असता. परंतू त्यांनी स्वत: तसे न करता दोन पिड्यांच पुरागामीत्व मातीत गाढून संविधान विरोधी लोकांना जवळ केल याच दु:ख वाटते. नांदेडकरांनी नेहमी संविधान विरोधी शक्तीला थारा दिला नाही आणि येणाऱ्या काळातही देणार नाहीत. असा विश्र्वास आहे. यापुढे सर्व आपण सर्व नांदेडकर एकजुट होवून आगामी लढाई लढू या असे आवाहन ओबीसी बहुजन मोर्चाचे मराठवाडा विभागीय संघटक ऍड.अविनाश भोसीकर यांनी केले आहे.
Labels
- #aarakshan
- #Ashok_Chavan | ex-CM #Ashok_Chavan_joins_BJP
- #cirme_story
- #DevendraFadnavis
- #Harat_Eid_Miladunbi
- #Maratha_aarkshn
- #modi_sarkar
- #Nanded #maharashtra #congers_news #morcha_in_kinwat #Vitthal_pawde
- #Nanded_News
- #Skills_training #devedra_fadnvis
- BRS Parti ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
- Leatest News
- LIVE TV
- Social Channels
- VIDEO
- ViralTruth
- WHAT'SApp
- मराठा आरक्षण
LIVE TV
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment