व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 12 September 2023

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा शार्पशूटर दिपक रांगा नांदेड पोलीसांच्या ताब्यात; आता पर्यंत १७ आरोपींना अटक

 प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा शार्पशूटर दिपक रांगा नांदेड पोलीसांच्या ताब्यात; आता पर्यंत १७ आरोपींना अटक


नांदेड - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या दोघा पैकी एका आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (23) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर राज्य हरियाणा असं या आरोपीचे नाव आहे. सोमवारी आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असतात न्यायालयाने २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शारदा नगर येथील त्याच्या घरासमोर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दोघांनी बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड असल्याची बाब तपासा दरम्यान समोर आली. खंडणी न दिल्याने संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल, इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरकसिंघ मेजर, हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंघ बाजवा, गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल, करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु, हरदिपसिंघ उर्फ हर्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार, हरीश मनोज बाहेती, रणजित सुभाष मांजरमकर, सरहानबिन अली अलकसेरी, गुरप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा, कमलकिशोर गणेशलाल यादव, सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश, दिव्यांश उर्फ पहेलवान रामचेत आदिना अटक केली आहे. मात्र गोळीबार करणारा दिपक रांगा हा फरार होता. आठ महिन्यापूर्वी एनआयएने दिपक रांगा याला नेपाळ बॉर्डर वरुन अटक केली होती. ९ मे २०२२ रोजी आरोपीने पंजाब पोलीसांच्या गुप्तहेर विभाग कार्यालयावर बॉम्बने हल्ला केला होता. या प्रकरणी एनआयएने २२ जानेवारी २०२३ रोजी अटक केली होती. रविवारी चंढीगड कारागृहातून आरोपी दिपक रांगा याला नांदेड पोलिसांच्या ताब्यात घेतले. आज आरोपीला नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुख्य शूटर अटक झाल्याने संजय बियाणी खून प्रकरणातील अनेक माहिती समोर येणार आहे.




No comments:

Post a Comment