मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये जाळपोळ. नांदेड-हैदराबाद महामार्गावर चक्काजाम व मरतळा येथे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. नायगावात रस्त्यावर टायर जाळले.
मराठा समाजालाआरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथे मराठा आंदोलकांनी नांदेड-हैदराबाद महामार्ग पाच तास रोखून धरला आहे. गावातून शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव पाटी, कुष्णूर, कौठा पाटी येथे आंदोलकांनी टायर जाळून 5 तास रास्ता रोको केल्याने अनेक कर्मचारी, अधिकारी व प्रवासी रस्त्यावर अडकून पडले आहेत.घटनास्थळी पोलीस यंत्रणा सतर्क असून आंदोलक रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत
No comments:
Post a Comment