व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 12 September 2023

शेतात गेलेल्या बाप-लेकाचा विजेच्या धक्यानें तडफडून मृत्यू; नांदेडमधील घटनेने एकच खळबळ

 एका शेतकरी कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात ही मन सून्न करणारी घटना घडली आहे. (Father And Son Died Due To Electrocution)

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोघेही बाप-लेक शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी शेताभोवती असलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरला होता. मात्र, हा प्रकार दोघांनाही माहिती नव्हता. दोघेही नेहमीच्या सवयीने काम करत असतानाचा याच तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने शॉक लागून दोघांचाही तडफडून मृत्यू झाला. तालुक्यातील पिंपळकौठा येथील बालाजी मगरे व त्यांचा 15 वर्षी मुलगा दत्ता मगरे सोमवारी संध्याकाळी दोघेही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेताच्या कडेला पिकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. याची दोघांनाही खबर नव्हती. दोघेही काम करत असताना दोघांचा तारांना स्पर्श झाला तारांचा स्पर्श झाल्याने दोघांनाही विजेचा झटका लागला आणि ते तिथेच कोसळले. बाप-लेकाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा-बाप लेकांनी निपचीत पडलेले पाहून त्यांनी तातडीने त्यांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शेतात काम करत असताना बाप-लेकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment