व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 18 September 2023

जगाला पुरोगामी विचार शिकवताततेच खरे संत -आधुनिक कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे

 

नांदेड- जगाला पुरोगामी विचार शिकवतात तेच खरे संत असतात असे प्रतिपादन आधुनिक कीर्तनकार हभपज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदीकर यांनी नांदेड येथे केले. 

कीर्तन हा विद्वत्ता दाखवण्याचा प्रकार नाही. कीर्तन ऐकायला सर्वसामान्य लोक येत असतात. तेव्हा, त्यांनासमजेल अशा सोप्या भाषेत बोलायचं हे मला गाडगेबाबांकडून कळलं अस हभप वाबळे महाराज आळंदीकरयांनी संगितल.  त्यांच्या किर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 

आंबेडकरी चळवळीत पहिल्यांदाच कीर्तनातून समाज प्रबोधन हा नाविन्यपुर्ण उपक्रम डॉ बी.आर.आंबेडकरफाऊंडेशनने नांदेड येथे आयोजित केला होता. सुप्रसिद्ध नामवंत ज्यांच्या वाणीत भक्ति शक्ती दडलेली आहेअसे समाज प्रबोधनकार हभप वाबळे महाराज आळंदीकर यांचा कीर्तनाचा सोहळा  झाला. पीआरपीचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार भीम महोत्सव नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालयात संपन्न झाला. डॉ बी आर फाऊंडेशनचे अध्यक्ष बापुराव गजभारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार डॉ सौ वर्षाली किन्हाळकर यांना तर कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार  दैनिक लोकमत समाचारचे पत्रकार पन्नालाल शर्मायांना व छायाचित्र पुरस्कार हाफिज पठाण, स्मृतिशेष मनोज गाजभारे प्रध्यन्यावंत विद्यार्थी पुरस्कार सिधांतमहाबळे यांना प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

या सोहळ्याला पीआरपीचे राष्ट्रिय कार्यअध्यक्ष जयदीप कवाडे,माजी खासदार सुभाष वानखेडे,माजीआमदार ओमप्रकाश पोकर्णा,वादळवारा फेम कलावंत अनिरुद्ध वनकर, पुज्य भंते डॉ उपगुप्त महाथेरो,पुज्यभंते पैयांबोधी महाथेरो, हभप गुरुवैर्य वाबळे महाराज आळंदीकर, भीम महोत्सवाचे स्वगताध्यक्ष तथा नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,चरणदास इंगोले,मुंडे,माजी नगरसेवक जी नागय्या,ओबीसी नेते बालाजीशिंदे,शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे,बाळासाहेब देशमुख तरोडेकर,डॉ कहाळेकर,ऍड सुरेंद्रघोडजकर,पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे,धनंजय उमरीकर,सुर्यकांत पटणे,प्रशांत इंगोले,राजेंद्रशुक्ला,सहसचिव कुलदीप चिकाटे,प्रमोद गजभारे,ईश्वरप्रसाद अग्रवाल,सतिष पांडवे माधव मोरे हे मान्यवर या शानदारसोहळ्याला उपस्थित होते.. प्रारंभी डॉ बी आर फाऊंडेशनचे कार्यवाह आकाश गजभारे यांनी प्रास्ताविककेले. आभार प्रदर्शन मारोती कदम यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने जनसमुदाय उपस्थित होता.

No comments:

Post a Comment