नंदुरबार - खासदार डॉ. हीना गावित यांच्या वाहनाला झालेल्या तोडफोडच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांकडून सोमवारी (1 ऑगस्ट रोजी) नंदुरबार बंदची हाक देण्यात आली आहे. यासोबतच सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. तत्पूर्वी रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवापूर येथे नागपूर-सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आंदोलकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली असे सांगितले जात आहे. परंतु, स्थानिक मराठा आंदोलनाच्या समन्वयकांनी त्याचा आपल्या आंदोलनाशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
वाहनावर चढले होते कथित आंदोलक
जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी धुळे, नंदुरबार या शहरांच्या डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीला खासदार हीना गावित, आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, अनिल गोटे इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली. बैठक सुरू होणार त्यापूर्वीच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोळा झाले. बैठक संपताच सर्वप्रथम हीना गावित बाहेर पडल्या. संतप्त आंदोलकांनी त्यांचे वाहन अडवत चर्चेची मागणी केली. मात्र, त्यांनी चर्चेला नकार दिला. त्यामुळे अचानक पेटले आणि आंदोलकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर बराच वेळ बैठक संपल्यानंतरही नेते आतमध्ये अडकले होते.

No comments:
Post a Comment