व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 6 August 2018

गुप्तधनासाठी घरात खोदले खड्डे, जादूटोण्याच्या वस्तूंसह दोघा भावंडांना अटक




जालना- गुप्तधनाच्या लालसेने दोघा भावांनी सकून पाहून देवाचा कौल घेतला. त्यानंतर राहत्या घरातच जवळपास तीन तास खोदकाम केल्यानंतर चार फूट लांब, अडीच फूट रुंद आणि तीन फूट खोलीचे दोन खड्डे खोदले. मात्र खबऱ्याकडून माहिती मिळताच अवघ्या १५ मिनिटांत पोलिस तेथे पोहोचले आणि खोदकाम सुरू असतानाच खोदकामाचे साहित्य व जादूटोण्याच्या वस्तूंसह दोघांना अटक केली. शिवाजी देवराव अवघड (४२) व ज्ञानेश्वर देवराव अवघड (३९) अशी आरोपींची नावे अाहेत. शहरातील कपूर गल्ली भागात ही कारवाई करण्यात आली. 

जुना जालना भागातील कपूर गल्ली येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर एका पत्र्याच्या घरात खोदकाम सुरू असल्याची माहिती चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली. त्यांनी ही माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पीआय किशोर बोर्डे यांना कळवली. त्यानंतर या दोघांनीही एक पथक तयार करून तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी तेथे पोहोचताच खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याचा अडसर निर्माण झाल्याने दरवाजा उघडता आला नाही. दोन व्यक्ती खोलीत खोदकाम करत असल्याचे पोलिसांनी दरवाजाच्या फटीतून दिसले. 

दरम्यान, दुसऱ्या दरवाजातून पोलिसांनी त्यांना आवाज दिल्यानंतर दोघांनीही दरवाजा उघडला. त्या वेळी खोलीत ४ फूट लांब,अडीच फूट रुंद आणि जवळपास तीन फूट खोल असे दोन खड्डे खोदलेले दिसून आले. शिवाय हळद, कुंकू, गुलाल, फुलवात, फोडलेले नारळ, आगपेटी, काळे बाहुले असे साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली. शिवाजी व ज्ञानेश्वर अवघड या दोघा भावांची पंचायत समिती परिसरात चहाची टपरी आहे. 
घरात जमिनीखाली महादेवाची मूर्ती व गुप्त धन असल्यानेच आपण खोदकाम करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दोघांविरुद्धही महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

नरबळीचा प्रकार?
अशा प्रकारांमध्ये प्रामुख्याने काही दिवसांनंतर नरबळी दिला जातो, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी सांगितले. सकून पाहणे ही अंधश्रद्धा आहे. गुप्तधनासाठी खोदकाम केल्यानंतर गुप्तधन तर मिळत नाहीच, मात्र नंतर मांत्रिक नरबळी देण्याचा सल्ला देतो, असे गायकवाड म्हणाले.परंतु पोलिसांनी हा नरबळीचा प्रकार नसल्याचे म्हटले आहे. 

चार वर्षांत जिल्ह्यात अंधश्रद्धेचे ५ गुन्हे 
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अंधश्रद्धेचे पाच गुन्हे नोंद आहेत. दोन वर्षांपूर्वी दाभाडी येथे गुप्तधनासाठी भोळसर युवकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. तर रेवगाव येथे मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका ६० वर्षीय व्यक्तीचा खून केला होता.

जादूटोण्यातून प्रकार 
खोदकामाच्या ठिकाणी हळद, कुंकू, गुलाल, फुलवात, लोखंडी खिळा, चमडा, गोटा, काळे बाहुले, नारळ, गोमूत्र, उदबत्त्या, सेलो टेप असे साहित्य मिळून आले. त्यामुळे जादूटोण्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

शिवाजी अंधश्रद्धाळू 
शिवाजी व ज्ञानेश्वर अवघड हे दोघे सख्खे भाऊ आहेत. शिवाजी अंधश्रद्धाळू आहे. सकून पाहण्यासह तंत्रविद्या सांगण्याचा प्रकार तो करतो. या प्रकारात त्यानेच सकून पाहून देवतेचा कौल घेतला व त्यानंतर घरात गुप्तधन असल्याची त्याची धारणा झाली. या अंधश्रद्धेतून त्यांनी घरात खोदकाम सुरू केले आणि ते पोलिसांच्या हातात पडले. 


No comments:

Post a Comment