व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 5 August 2018

मराठा आरक्षणापर्यंत मेगा भरतीला स्थगिती; नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू -मुख्यमंत्री


मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तसेच मराठा आरक्षणावर कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिना संपेपर्यंत कारवाई पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी काही कसोटी ठरवून दिल्या आहेत. त्या पूर्ण झाल्याशिवाय आरक्षण कोर्टात टिकणार नाही. आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीच राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. सोबतच, हा आयोग सरकारने स्थापित केला तरीही तो पूर्णपणे स्वायत्त आणि स्वतंत्र आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
मेगा भरती थांबवली...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात होणारी मेगा भरती थांबवत असल्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवली जाईल. मेगा भरती संदर्भात अनेक मराठा तरुणांमध्ये गैरसमज होते त्यामुळे या भरतीला स्थगिती दिली जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आत्महत्या, जाळपोळ करू नका...
राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. हिंसक घटनांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. अशाच प्रकारच्या घटना वाढत गेल्यास महाराष्ट्राचे नाव खराब होईल आणि गुंतवणूकदार सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. हिंसक आंदोलन किंवा आत्महत्या करू नका. ही वेळ चर्चेची आहे त्यामुळे आपण चर्चेतूनच मार्ग काढू असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
7 ऑगस्टला तारीख निश्चित होईल
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी काही निकष ठरवून दिले आहेत ते पूर्ण करण्यासाठीच राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. 7 ऑगस्ट पर्यंत राज्य मागासवर्ग आयोग किती तारखेला अहवाल देणार याची घोषणा करणार आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला निर्देश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत यावर कारवाई पूर्ण केली जाईल असा सरकारचा मानस आहे
अध्यादेश आत्ताच काढला जाऊ शकतो पण...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यभरात अध्यादेश काढण्याची मागणी केली जात आहे. सरकारने मागासवर्ग आयोग स्थापिकत केला त्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. अध्यादेश आत्ता काढला जाऊ शकतो. परंतु, तो तात्पुरता ठरेल आणि कोर्टाने ठरवलेल्या कसोटीवर तो टिकूच शकणार नाही. अशा प्रकारच्या अध्यादेशातून जनतेची फसवणूक होईल


No comments:

Post a Comment