व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 30 July 2018

काही लोक उद्योगपतींसोबत फोटो काढायला भितात; मोदींनी अमरसिंह यांच्याकडे केला इशारा



लखनऊ-पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी लखनऊत होते. हा त्यांचा यूपीचा एका महिन्यातील सहावा दौरा आहे. त्यांनी लखनऊत फेब्रुवारीत आयोजित उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेत राज्याला मिळालेल्या गुंतवणुकीतून तयार केलेल्या योजनांचा शिलान्यास केला. सरकार आणि भाजपची उद्योगपतींशी जवळीक असल्याचा विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देताना मोदी म्हणाले की, 'जे उद्योगपतींच्या बाजूला उभे राहण्यास घाबरतात अशा लोकांपैकी आम्ही नाहीत. काही लोकांचे एकाही उद्योगपतीसोबतचे छायाचित्र तुम्हाला आढळणार नाही, पण देशातील एकही उद्योगपती असा नसेल, ज्याने घरी जाऊन त्या लोकांना साष्टांग दंडवत घातले नसेल.' मोदींनी सपाचे माजी नेते अमरसिंह यांच्याकडे इशारा करत म्हटले की, अमरसिंह सर्वांची कुंडली काढून देतील. देश उभारणीत शेतकरी, बँकर, कारागीर, मजूर, सरकारी कर्मचारी यांची जेवढी भूमिका असते तेवढीच महत्त्वाची भूमिका उद्योगपतींचीही असते. उद्योगपतींना चोर-लुटारू म्हटले जाते.

६० हजार कोटींचे ८१ प्रकल्प केले सुरू
मोदींनी लखनऊत ६० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या ८१ योजनांचा शिलान्यास केला. अनेक मोठे उद्योगपती या वेळी उपस्थित होते. मोदी शनिवारीही लखनऊमध्ये होते, तेव्हा त्यांनी स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजनांशी संबंधित ३,८९७ कोटी रुपयांच्या ९९ योजना सुरू केल्या होत्या.

गांधीजींना बिर्ला कुटुंबासोबत राहण्यास संकोच वाटला नाही
महात्मा गांधींचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, त्यांचे जीवन खूप पवित्र होते. त्यांना कधीही बिर्लांच्या कुटुंबासोबत राहण्यात संकोच वाटला नाही, कारण त्यांचा हेतू स्वच्छ होता. ज्यांना लोकांसमोर उद्योगपतींना भेटायचे नसते, पण पडद्याआड सर्व करायचे असते, त्यांना भीती वाटते.

मोबाइल निर्मितीत भारत जगात दुसऱ्या स्थानी
मोदी म्हणाले की, आयटी उद्योग ही भारताची शक्ती आहे. आज आयटीची निर्यात विक्रमी आहे. ४० लाख लोक या उद्योगात आहेत. तरीही तो शहरांपुरताच मर्यादित आहे. भारत जगासाठी मोबाइल उत्पादनाचे हब झाले आहे. याबाबत आपण दुसऱ्या स्थानी आहोत.

निसर्गप्रेमी आणि रक्षक होणे ही जबाबदारी : मोदी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ४६ व्या वेळी 'मन की बात'द्वारे संदेश दिला. ते म्हणाले, देशाच्या काही भागांत खूप पाऊस पडत आहे, तर कुठे पावसाची प्रतीक्षा आहे. आपण निसर्गप्रेमी आणि रक्षक होण्याची गरज आहे. थायलंडमध्ये ११ खेळाडू आणि एक कोच पावसामुळे गुहेत १८ दिवस अडकून पडले. जगभरात त्यांच्यासाठी प्रार्थना झाली. संपूर्ण कारवाई कशी झाली त्याकडे पाहावे. प्रत्येक स्तरावर जबाबदारीची अद््भुत भावना होती. हा अभ्यासाचा विषय आहे.

३ सकारात्मक गोष्टी : युवकांनी कॉलेज जीवनाचा आनंद घ्यावा
नवी कौशल्ये शिका : मोदी म्हणाले की, जुलै-ऑगस्टचा महिना शेतकरी, युवकांसाठी महत्त्वाचा असतो. युवक कॉलेज जीवनाच्या सुरुवातीमुळे उत्साही, आनंदी असतील. नव्या जीवनाचा आनंद घ्या, पण नवी कौशल्येही शिका.
मेहनतीने सर्व शक्य :मध्य प्रदेशचे आसाराम चौधरी हे अडचणींवर मात करत जोधपूर एम्सची एमबीबीएसची परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले. रायबरेलीचे योगेश आणि रजनीश यांनी माझ्या आव्हानावरून स्मार्ट गाव नावाचे अॅप बनवले. 
पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा :एक ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला. यंदाही सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा

No comments:

Post a Comment