घरातील छोट्या मुलांना सांभाळताना कित्येकदा पुर्ण झोप घेणे आईला शक्य नसते. याबद्दलचा एक व्हिडिओ लॉस अँजिलिस येथील मेलानिया डार्नेल यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या पुर्ण रात्र आपल्या दोन मुलांना सांभाळताना झोपेसाठी स्ट्रगल करताना दिसतात.
सकाळी उठल्यावर मेलानिया नेहमी थकलेली का दिसते, असा प्रश्न मेलानियाच्या पतीला पडायचा. याला उत्तर म्हणून अख्ख्या रात्रीचा व्हिडिओच मेलानियाने तयार केला. यासाठी त्यांनी आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मिडियावर fitmomma4three या नावाने प्रसिद्ध असणा-या मेलानियाने हा व्हिडिओ पोस्ट करून मदरहूड म्हणजे काय असते हे सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओमध्ये मेलानिया आपल्या तिन्ही मुलांना झोपवून रात्री 10 वाजता झोपण्यास जातात. मात्र एका तासानंतरच त्यांचा 10 महिन्यांचा मुलगा माइलाला जाग येते. नंतर मेलानिया माइलाला घेऊन आपल्या खोलीत येतात. व जवळपास 20 मिनटे त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत झोपी त्याही झोपी जातात.
नंतर 1 वाजता दुस-या खोलीत झोपलेली त्यांची 2 वर्षांची मुलगी रडत रडत मेलानियाजवळ येते. मेलानिया तिला शांत करतात व जवळपास दीड वाजता तिला परत तिच्या खोलीत झोपवून येतात. नंतर मेलानिया पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते मात्र माइलो त्यांना झोपू देत नाही. कधी तो त्यांचे केस ओढतो तर कधी मेलानियाला उठवण्याचा प्रयत्न करत राहतो. यादरम्यान मेलानिया झोपण्याचा कसाबसा प्रयत्न करते. सकाळी 6.30 वाजता मेलानिया सकाळच्या कामांसाठी जागी होते.
मेनालियाचे पती ट्रॅव्हलिंग जॉबमध्ये आहेत व बहुतांश वेळ ते घराबाहेरच घालवतात. यामुळे मेलानियाला एकटीलाच तिन्ही मुलांचा सांभाळ करावा लागतो.
संतुलन साधणे अवघड
व्हिडिओ पोस्ट करताना मेलानियाने म्हटले आहे की, सुर्य बुडाल्यानंतरही पालकाची जबाबदारी संपत नाही. दिवस असो की रात्र मुलांकडे लक्ष द्यावेच लागते. आपली झोप, मुलांची देखभाल आणि त्यांच्या भावनिक गरजा पुर्ण करणे, यामध्ये बॅलेंस साधणे अत्यंत अवघड काम आहे. तरीही जिवनातील मातृत्वाचा हा अनुभव फार सुंदर असल्याचे मेलानियाने म्हटले आहे.
मातांना केले हे आवाहन
हा व्हिडिओ शेअर करताना मला सगळ्या आयांच्या त्या सुंदर आठवणी जागवायच्या होत्या ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी रात्ररात्र जागून काढल्या. मेलानिया म्हणाल्या, हे दिवस काहीसे कठिण आहेत. मात्र हे दिवस थोड्याच काळासाठी आहेत. म्हणून घड्याचे काटे कुठेही असोत आपल्या मुलांची प्रत्येक गरज पुर्ण करा, असे आवाहन त्यांनी केले
हा व्हिडिओ शेअर करताना मला सगळ्या आयांच्या त्या सुंदर आठवणी जागवायच्या होत्या ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी रात्ररात्र जागून काढल्या. मेलानिया म्हणाल्या, हे दिवस काहीसे कठिण आहेत. मात्र हे दिवस थोड्याच काळासाठी आहेत. म्हणून घड्याचे काटे कुठेही असोत आपल्या मुलांची प्रत्येक गरज पुर्ण करा, असे आवाहन त्यांनी केले
No comments:
Post a Comment