व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 30 July 2018

इंडोनेशियात 6.4 तीव्रतेचा भूकंप, 14 जणांचा मृत्यू; सलग 60 झटक्यांत 1000 इमारती जमीनदोस्त



इंडोनेशियातील बाली येथे रविवारी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला असून यात 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बाली - इंडोनेशियातील बाली येथे रविवारी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला असून यात 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या हादऱ्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यांच्या ढिगाराखाली अजुनही अऩेक जण दबल्याची भीती आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये एका पर्यटकाचा देखील समावेश आहे. तसेच जखमींची संख्या 162 सांगितली जात आहे. अमेरिकन भूगर्भशास्त्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या भूकंपाचा केंद्र पूर्वेकडील लोम्बोक होते. एका मोठ्या धरणीकंपानंतर सलग 60 कंपन जाणवले आहेत. काही सेकंदांच्या फरकाने अनेक मिनिटे सुरू असलेल्या या भूकंपात 1 हजारहून अधिक इमारती कोसळल्या आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
आपत्ती व्यवस्थापन दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, भूकंपात 1000 इमारती कोसळल्या आहेत. अनेक इमारतींपर्यंत बचाव पथक अजुन पोहचू शकलेले नाही. त्यामुळे, जखमी आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. सोबतच, अतिरिक्त पथक बोलावून आणि स्थानिकांच्या मदतीने जास्तीत-जास्त लोकांना जिवंत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचाव पथकाने घटनास्थळाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये अख्खे शहर उद्ध्वस्त झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. स्थानिक माध्यमांच्या मृत्तानुसार, भूकंपाची तीव्रता अधिक होती. लोक वेळीच आपल्या घरातून बाहेर पडले. परंतु, इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्वांना ते शक्य झाले नाही. परिसरातील वीज सुद्धा गायब आहे.

No comments:

Post a Comment