व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 6 February 2018

हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?



नमिता जैन, क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड मॅनेजमेण्ट एक्स्पर्ट 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण-तणाव सर्वत्र पसरले आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत उच्च रक्तदाब ही समस्या सध्या सर्वांनाच भेडसावतेय. या हायपर टेन्शनला नियंत्रणात ठेवण्यासाठी या टीप्स नक्की मदत करतील.

दररोजचा व्यायाम गरजेचा 

उच्च रक्तदाबासाठीचं एक प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक सशक्त पाऊल म्हणजे दररोजचा व्यायाम. नियमितपणे शारीरिक हालचाली करणाऱ्या मंडळींना रक्तदाबाचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी असतो. चालणं, जॉगिंग करणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं असा कुठल्याही प्रकारचा व्यायाम नित्यनेमाने दररोज तीस मिनिटांसाठी करणं हितकारक ठरतं. आपलं वजन आणि उंची यांचा योग्य समतोल राखणं आवश्यक आहे. 

शरीराला हवा मसाज 
पंधरा दिवसातून एकदा किंवा किमान महिन्यातून एकदातरी संबंध शरीराचा मसाज करायला हवा. यामुळे आवळलेले स्नायू शिथिल होतात व शरीराला एक आरामदायी अनुभव मिळतो. 

चित्तासाठी चिंतन 

दोन मिनिटं डोळे मिटून शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर मानसिक समतोल राखणं सोपं जातं. विचारांचा गोंधळ निवळायला मदत होते व मन एक स्थिर स्थिती साधू शकतं. 

शांत झोप गरजेची 
शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. रात्रीची शांत झोप मिळाली तर सगळ्या चिंता पळून जातात आणि बराचसा ताण हलका होतो. रिलॅक्स होण्यासाठी दीर्घ श्वसनाचे व्यायाम प्रकारही फायदेशीर ठरतात. 

मीठावर ठेवा नियंत्रण 

आपल्यापैकी बहुतेकजण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करतात. त्याचं योग्य प्रमाण हे दररोज २४०० मिलिग्रॅम म्हणजे फक्त एक टीस्पून इतकंच असायला हवं. आहारातील सोडियमचं प्रमाण अल्प असेल तर रक्तदाब वाढत नाही व तो नियंत्रणात राहण्यास ते एक औषधचं ठरतं. 

मौल्यवान जीवनसत्त्वांचं मूल्य 

आहारातील कॅलशियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, 'क' जीवमसत्त्व, ओमेगा-३ हे घटक रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतात. 

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (AHA) च्या सल्ल्यानुसार : 

- मांसाहरची स्कीन काढून तो शिजवण्यात यावा. 

- लाल मटण खाण्याऐवजी मासे व पांढऱ्या मटणास पसंती द्यावी. 

- लो फॅट मिल्कचा वापर करावा. 

- एका आठवड्यात फक्त दोन अंडी खाण्यास परवानगी आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळावं. 

- शिळं अन्न व पॅकेज्ड पदार्थांचं सेवन शक्यतो करू नये. 

No comments:

Post a Comment