चित्तौडगड- राजस्थानमधील चित्तौडगड-कोटा फोरलेनवर आज (बुधवार) झालेल्या कार अपघातात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन जखमी झाल्या. या अपघातात जशोदाबेन यांचा चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. जशोदाबेन एका विवाह समारंभात जात असताना हा अपघात झाला. जशोदाबेन यांच्या यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना चित्तौडगड येथील सावलिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनुसार, पारसोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत काटूंदा येथे हा अपघात झाला. कारमध्ये सहा जण होते. त्यापैकी जशोदाबेन यांचे चुलत भाऊ वसंत भाई यांचा मृत्यू झाला. जशोदाबेनसह इतर चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सावलिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. समोरील ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला.


No comments:
Post a Comment