नवी दिल्ली
आधार कार्डला तुम्ही लॅमिनेशन किंवा प्लास्टीक कोटिंग केलं असेल तर ते आता बिनकामाचे होणार आहे, असं युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने स्पष्ट केलं आहे. लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधारकार्डची गुणवत्ता कमी होते त्यामुळे आधारकार्डचा क्यूआरडी कोड स्कॅन करणे कठीण होते, त्यामुळे ते आधारकार्ड काहीही उपयोगाचे राहत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार कार्डला लॅमिनेशन केल्याने किंवा त्याचे प्लास्टिक स्मार्ट कार्ड बनवल्याने तुमची खासगी माहिती चोरली जाऊ शकते. तुमचा क्यूआरडी कोड स्कॅन करून ही माहिती मिळवणे शक्य आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा, असं आवाहन UIDAI केलं आहे. आधारला स्मार्ट कार्ड करण्याची काहीही गरज नसल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी म्हटलं आहे. तुमच्या आधारकार्डची खासगी माहिती अनेकदा चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा प्रकारे आधारशी कोणतीही छेडछाड करणं हा कायद्याने गुन्हा असल्याचंही भूषण पांडे यांनी सांगितलं.

No comments:
Post a Comment