औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांची पदवी गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. कुलगुरुंची प्री-डिग्री सायन्स या विषयाची पदवी 22 जानेवारी 2018 रोजी विद्यापीठ परिसरातून पदवी गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कुलगुरू चोपडे यांनी 1974 मध्ये कराड महाविद्यालयातून प्री-डिग्री सायन्स या विषयाची पदवी प्राप्त केली होती. हीच पदवी गळाळ झाल्याचे समजते. दरम्याम, 2014 मध्ये चोपडे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती.

No comments:
Post a Comment