नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी महापालिकेत एक बैठक बोलावली होती. याच बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढले.
तुकाराम मुंढे यांनी बोलवलेल्या पालिकेतील बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे आधीच उशिरा पोहचले. त्यातही ते गणवेश परिधान न करुन आल्याने त्यांना गणवेश घालून येण्याच्या सूचना देत बैठकीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अनिल महाजन हे पंधरा मिनिटात गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले.

No comments:
Post a Comment