व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 9 February 2018

घरोघरी जाऊन मतदारांना भेटवस्तू द्या : चंद्रकांत पाटील

गलीमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केल होतं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला


सांगली : मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जावं आणि भेटवस्तू द्यावी, असा अजब सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

सांगली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपनेही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आज सांगलीमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केल होतं. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला.

''बूथ रचना झाली आहे, 15 दिवसात कार्यकर्त्यांनी 200 घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्या, '' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून 18 नाही, तर 28 नगरसेवक आले तरी त्यांना भाजपात घेऊ. फक्त त्यांची पार्श्वभूमी बघून प्रवेश देणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment