व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 10 February 2018

महामार्ग संघर्षाची ठिणगी पेटली*महामार्ग मोजमापाच्या तंड्या संतप्त शेतक-यांनी फेकल्या उपटून,*



दाभड:-
       अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव म.,दाभड येथील माहामार्गावरील बाबा पेट्रोल पंपावर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली शेतक-यांची बैठक झाली.
     महामार्ग क्र.३६१ नागपूर- तुळजापूर साठी जमिनीचे अधिगृहन केल्या जात आहे  याबाबत शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत त्यांना विश्वासात घेतलं नाही त्यांची सहमती घेतली नाही . काही अधिकाऱ्यांनी परस्पर शेतकऱ्यांच्या शेतात मोजणी करून त्या आरोळ्या होत्या . व कितीही जमीन रोडसाठी घेतली तरी त्यापैकी फक्त पाच गुंठे जमिनीलाच शंभर टक्के मावेजा देण्याचे धोरण असल्याने आज संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सदरील मोजमाप केलेल्या त्या उघडून फेकून दिल्या व शासनाने शंभर टक्के मावेजा न दिल्यास भविष्यात हे आंदोलन उग्र होण्याची चुणूक शेतकऱ्यांनी दाखवून दिली . हा लढा फक्त जमिनी जाणार्या शेतकऱ्यांचा नसून सर्वच शेतकऱ्यांचा असल्याने या आंदोलनात सर्वच शेतकरी सहभागी होणार आहेत.   जमिनी चा मावेजा योग्य पध्दतीने   संबंधित शेतक-यांच्या जमिनीला जो पर्यंत १००% मावेजा मिळनार नाही तोपर्यंत  एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याला आपल्या शेतात फिरकू देऊ नये असे आव्हान  इंगोले यांनी केले. शेतक-यांची सहमती न घेता  ज्या अधिका-यांनी शेतात तंड्या रोवल्या होत्या त्या तंड्या उखडून फेकून दिल्या,शंभर टक्के मावेजा न देता केवळ पाच गुंठे जमिनीलाच शंभर टक्के मावेजा दिल्या जात आहे.हे आम्हाला मान्य नाही.या आगोदर ही रस्त्याचे अधिगृहन झाले शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या या प्रकरणांना अनेक वर्षे लोटून गेल्यावर ही शेतक-यांना न्याय मिळाला नाही त्या शेतक-यांची आंदोलने आजतागायत सुरू आहे त.योग्य मावेजा नाही भेटला तर इंचभर ही जमिन देणार नसल्याचा ठाम निर्णय शेतक-यांनी घेतला.
        भुमी संपादनाबाबत देशात एकच कायदा असताना वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निकस का,अर्धापूर तालुक्यात आता संघर्षाची ठिनगी पेटनार शेतकर्यांची नवी पिढी आता रिंगनात उतरली आहे. पुर्वीचा शेतकरी अशिक्षीत होता आता शेतकर्यांची पोर शिकली आहेत शासनाच्या भुल थापांना ते बळी पडनार नाहीत.राजकारणात अनेक वाद आसतील पण सगळेच पक्ष शेतकर्यांचा पाठीमागे खंबीर उभे आसुन मा.राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्या संघर्षाला सामोरे जानार आसल्याची ठाम भुमिका शेतकरी  संघटनेचे प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली.यावेळी प्रहार पक्षाचे जिल्हा संघटक विठ्ठलराव देशमूख,सरपंच सदाशिवराव देशमूख,हनमंत राजेगोरे,चंद्रकांत बाफना, यांनी मार्गदर्शन केले. ग्रा.पं.मध्ये शेतक-यांच्या प्रश्नांसंबंधी ठराव घेत अर्धापूर सरपंच संघटना यांनी शेतक-यांना पाठिंबा दिला.
              पत्रकार बांधवही या लढ्यात शेतकर्यांची बाजु मांडत आसुन शेतकर्यांवर अन्याय होता कामा नये हे शासनाला ठनकावुन सांगत आहेत. शासनाची ही मोघलाई आशीच सुरु राहीली तर तालुक्यातले बहुतांशी शेतकरी भुमीहिन होतील . त्यांच्या रोजी रोटी  बंद होईल, बापजाद्यांन पासुन राखलेली काळी आई धनधाडग्यांच्या घशात जानार आसेल तर शेतकरी पेटुन उठनारच यात शंका नाही.
यावेळी विठ्ठलराव देशमुख, सदाशिवराव देशमुख ,हनुमंत राजेगोरे ,विठ्ठलराव देशमुख ,चंद्रकांत बाफना यांनीही मार्गदर्शन केले .दाभड,बामणी,पिंपळगाव,खडकुत ,शेलगाव ,जांभरुन येथील शेतकरी उपस्थित होते .
कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव जिंके बामणीचे सरपंच सतीश कदम, पिंपळगावचे सरपंच सदाशिवराव देशमुख, खडकुतचे सरपंच संजयराव कँकाळ,नारायणराव देशमुख राजू पाटील टेकाळे ,जांभरून चे सरपंच गंगाधर तिमेवार,रेस कदम नंदा किशोर देशमुख नारायण देशमुख आनंदराव दवे ,चंद्रकांत पाटील टेकाळे कंत्राटे कांतराव टेकाळे, शेशेराव टेकाळे ,साहेबराव दळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment