नांदेड (प्रतिनिधी)- येथोल रहिवाशी व वन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गणपतराव शिराढोणकर यांची कन्या श्वेता शिराढोणकर हिची वैद्यकीय अधिकरी वर्ग-2 या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग जि.उस्मानाबाद येथे नियुक्ती झाली आहे.
घरची परिस्थिती हलाकीची असतानाही गणपतराव शिराढोणकर यांनी श्वेताला मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता तिच्या मनाप्रमाणे उच्च शिक्षण दिले. अत्यंत जिद्दीने श्वेताने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. नुकतीच ती या पदावर रूजू झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment