व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 23 January 2018

2019 च्या लोकसभा- विधानसभा निवडणूका शिवसेना स्वतंत्र लढविणार- कार्यकारिणीत ठराव मंजूर



मुंबई- मित्रपक्ष व सत्ताधारी भाजपला आव्हान देत शिवसेनेने स्वबळाची भाषा करत, 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज जाहीर केला. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी सभा मुंबईतील वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात सुरू आहे. यात अनेक महत्त्वाचे ठराव आणि घोषणा केल्या. यात 2019 च्या निवडणुकीचे रणशिंगही आजच्या कार्यकारिणी सभेत फुंकले गेले. 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला याला खासदार देसाई यांनी अनुमोदन दिले.
आजच्या कार्यकारिणीत खालील ठराव मंजूर करण्यात आले-
- महाराष्ट्रासह देशातील शेतक-यांना हमीभाव द्या, कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा.
- सर्व मराठी माणसांची एकजूट केली जावी. आज जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावली जात आहेत. यातून मराठी समाजात फूट पडत चालली आहे त्यामुळे मराठी माणसांच्या एकजूटीचा ठराव मंजूर करण्यात आला.
या नेत्यांची लागली वर्णी-
- आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड झाली आहे.
- उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि युवा सेनेचे सूरज चव्हाण यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
- अनिल परब, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, नीलम गो-हे, अरविंद सावंत या पाच जणांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठराव व नव्या निवडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले.
- उद्धव ठाकरे म्हणाले, स्वबळाची भाषा करणे म्हणजे पाप नाही.
- जाहिरातबाजी करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे.
- भाजपशी फारकत घेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय दिसत नाही.
- नितीन गडकरींकडून नौदलावर जाहीर टीका कशासाठी? हा सत्तेचा दर्प, उद्या लष्कर नेत्यांना म्हणेल, तुम्ही येथे कशासाठी मग चालेल का?
- हिंदुत्त्वासाठी आम्ही इतर राज्यात निवडणूका लढविल्या नाहीत मात्र, यापुढे सर्व राज्यात शिवसेना हिंदुत्त्वाच्या मुद्यांवर निवडणूक लढवेल.
- मोदी म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, खरंच अच्छे दिन आले आहेत?
- गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा काय संबंध? नेतान्याहूंना अहमदाबादला कशाला नेलं?, रोड शो कशासाठी? काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना असले उद्योग कशाला करता?

No comments:

Post a Comment