व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 22 January 2018

नांदेड - अपंग, वृद्ध, निराधार यांच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेवर व जिल्हाधिकारी कार्यालयावर दवंडी मोर्चा धडकला



अपंग मित्र मंडळ संघर्ष सेना महाराष्ट्र, जिल्हा नांदेड यांच्या वतीने अपंग, वृद्ध, निराधार यांच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेवर दि. २० रोजी दवंडी मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भारताचे संविधान, वाचन, राष्ट्रगीत घेवून दवंडी मोर्चा जि.प. कार्यालयावर धडकला, पण अपंग, वृद्ध, निराधाराच्या मागण्याचे निवेदन घेण्यासाठी संबंधित जि. प. मध्ये एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मोर्चेकरांनी मुख्यकार्यकारी, उपमुख्यकार्यकारी, समाज कल्याण अधिकारी यांच्या खुर्चीकडे मोर्चा वळवला तेंव्हा गोंधळाची परिस्थितीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोर्चेकरच्या समोर जाऊन निवेदन स्वीकारले तेंव्हा डाकोरे यांनी अपंग निराधार यांच्या संबंधित विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे तीन दिवसापासून चालू असून एकाही खात्याचे अधिकारी यांनी  भेट घेतली नाही.
        शिष्ठ मंडळ दि. १९ जानेवारी २०१८ रोजी मा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली.  
        दीड महिन्यापासून वारंवार निवेदन देवून सुद्धा त्यांची अध्याप दखल घेतली नसल्यामुळे माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी भेट घेवून प्रत्यक्ष कार्यकरण्यासाठी खंबीरपणे पाठीसी आहे असे आश्वासन दिले तसेच गोरगरीब दुबळ्यासाठी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या अध्यक्षा विमलताई साळवे यांना माहिती मिळाल्याबरोबर ते धरणे आंदोलनात येवून ते तीन दिवसापासून सोबत बसले आहेत. खऱ्या अपंग निराधारांना न्याय मिळावा म्हणून साळवे मॅडम तनमनधनाने या गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.  
        या दवंडी मोर्चात अपंग, वृद्ध, निराधार हजारोंच्या संखेनी उपस्थित होते॰ पण साधी दखल घेतली नसल्यामुळे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालता आला नाही कारण गेटचे कुलूप काढले नसल्यामुळे मानवंदना करता आली नाही.
        नंतर मोर्चा महानगर कार्यालयात धडकला  तेंव्हा सूर्यवंशी सरांनी मोर्चासमोर येवून निवेदन घेतले व मागण्या मंजूर केलेलं पत्र दिले नंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून शिष्ठ मंडळ दि. २० जानेवारी २०१८ उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी मॅडम, नांदेड यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली व जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व संबंधितांना निवेदन मेलवर गेले व संबंधित खात्यावर कळविलेली प्रत धरणे आंदोलनात आणून दिली पण संबंधित खात्याकडून लेखी पत्र मिळाले नसल्यामुळे बेमुदत धरणे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यापही धरणे सुरु आहे.
        या मोर्चात हजारो अपंग, वृद्ध, निराधार, सामिल झाले होते. यात महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या महिला अध्यक्ष विमलताई साळवे, महाराष्ट्र राज्य कामगार संघटना, अध्यक्ष, सुरेश अंबुलगेकर, प्रांत सचिव शिवकांत स्वामी, अपंग मित्र मंडळ संघर्ष सेनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे, महिला संघटक यशोदा मॅडम, महाराष्ट्र राज्य कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सुनील बेजगमवार, गजानन वहीदे, नागोराव शिंदे, विठ्ठलराव मंगनाळे, दिगंबर लोणे, पांडुरंग कोल्हे, इम्रान खान पठाण, राजू शेरकुरवार, सत्यजित सोनकांबळे, आशाताई जाधव, सुषमा शेटे, ऋतुजा गोरे आदींचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment