व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 16 December 2017

गुजरात मधील आक्रमक प्रचाराने राहूल गांधींच्‍या विरोधात संतापाची लाट - खा. आठवले



मुंबई-गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि भारतीय जनता पक्षाविरोधात केलेल्या अाक्रमक प्रचाराचा काँग्रेस पक्षावरच विपरीत परिणाम झाला. या हल्ल्यामुळे राहुल गांधी यांच्याविराेधात संतापाची लाट उसळून तेथील जनतेने भाजपला माेठ्या प्रमाणावर मतदान केले अाहे. त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळणार असल्याने गुजरातमध्ये राहुल गांधी अपयशी ठरले असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास अाठवले यांनी शनिवारी मुंबर्इत केली. आठवले यांच्या उपस्थितीत दादरमध्ये ४३वी जायंट्स आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लाेकशाहीत अापल्या पक्षाला मजबूत करण्याचा अधिकार सर्वांनाच अाहे. जर गांधी, नेहरू परिवारातून काँग्रेसचा अध्यक्ष झाला नाही तर पक्ष तुटेल. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली अाहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करताे. अाता त्यांनी पक्षासाठी चांगले काम करून दाखवावे. २०१९ अाणि २०२४ मध्येही भाजपचेच सरकार येणार असल्याने काँग्रेसला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, असा दावाही अाठवले यांनी केला. गुजरातच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपला सर्व जागांसाठी पाठिंबा दिला अाहे.

No comments:

Post a Comment