मुंबई : पाकिस्तानने जगाला दाखवण्यासाठी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीसोबत भेट तर घडवून आणली, पण ती फक्त नावालाच होती. कुलभूषण जाधव आणि आई-पत्नी यांच्यात एक काचेची भिंत होती. त्यांच्यात फोनवरुन संभाषण झालं. पण या भेटीचा एक समोर आला असून त्यावरुन अनेक शंका-कुशंकाना पाठबळ दिलं आहे.
भेटीदरम्यान कुलभूषण जाधव निळ्या रंगाच्या कोट परिधान केला होता. पण या भेटीचा फोटो निरखून पाहिल्यास, जाधव यांच्या उजव्या कानावर गडद रंगाचं निशाण दिसत आहे. त्यांच्या डोकं आणि गळ्यावरही काही निशाण आहेत. ज्यावरुन हे जखमांचे निशाण असल्याचा संशय बळावला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही सवाल
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही या फोटनंतर प्रश्न उपस्थित केले आहे. जाधव यांच्या डोक्यावर काही जखमांसारखे निशाण आहेत, असं शशी थरुर म्हणाले. जाधव यांच्या डोक्यावर छळाचे निशाण असू शकतात, अशी शंकाही थरुर यांनी वर्तवली.
कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!
शहजाद पुनावाला यांची शंका
कुलभूषण जाधव यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमांसारखे काही निशाण दिसत आहेत, अशी शंका काँग्रेसचे माजी नेते आणि कार्यकर्ते शहजाद पुनावाला यांनीही व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचं कृत्य अमानवीय असल्याचं सांगत पुनावाला म्हणाले की, ज्याप्रकारे ही भेट झाली, त्याचा अर्थ काय? पाकिस्तानकडून जाधव यांचा छळ सुरु असल्याची शंकाही पुनावाला यांनी व्यक्त केली
No comments:
Post a Comment