व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 25 December 2017

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महागणार, बिअरच्या दरात मोठी वाढ



मुंबई : तुमचं थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महाग होण्याची शक्यता आहे, कारण बीअरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढणार आहे महागली आहेत. नववर्षाच्या मुहूर्तावर बिअरच्या दरात ही वाढ होणार आहे.

बिअरचे दर 35 ते 40 रुपयांनी वाढवण्याची मागणी उत्पादक कंपन्यांनी केली होती, जी राज्य सरकारनं मान्य केली आहे. मात्र बिअरच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ करण्यास सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे.

ऐन नाताळाच्या आठवड्य़ात आणि 31 डिसेंबरच्या तोंडावर होणाऱ्या या दरवाढीमुळे आठवडा अखेरीस होणारी बिअर विक्री मंदावणार असल्याचा अंदाज मद्यविक्रेता संघटनेनं व्यक्त केला आहे.

सध्या माइल्ड बिअरची बाटली सुमारे 135 रुपयांना मिळते, आता तो दर 155 ते 165 रुपयांपर्यंत जाणार आहे. तर स्ट्राँग बिअरच्या 140 रुपयांच्या बाटलीसाठी आता 160 ते 170 रुपये मोजावे लागतील

No comments:

Post a Comment