मेलेंग (आसाम )-भातशेतीच्या जमिनीवर आणि गवत व कडब्यापासून उभारलेल्या सभागृहात पहिल्या आसाम आंतरराष्ट्रीय ग्रामीण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महोत्सव अत्यंत दुर्गम अशा खेडेगावात आयोजित केला आहे. ग्रामीण जनतेला दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्यास मिळावेत या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे.
आसाम आंतरराष्ट्रीय ग्रामीण चित्रपट महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. जागतिक दर्जाचे उत्कृष्ट चित्रपट फेस्युअल नामक गावात दाखवण्यात आले. हे गाव मेलेंग टी गार्डन परिसरात आहे. जोरहाट शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. २३ डिसेंबर रोजी या चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. आसाम फिल्म सोसायटीने (एएफएस) याचे आयोजन केले असून ४ दिवस विविध चित्रपटांचे प्रदर्शन येथे होईल.
इटालियन, बांगलादेशी, सर्बियन, इराणी, मेक्सिकन, क्युबन चित्रपटांचे प्रदर्शन येथे झाले. याशिवाय आसामी, मणिपुरी, मल्याळम, मराठी, बंगाली या भारतीय भाषांतील चित्रपट येथे दाखवण्यात आल्याचे महोत्सवाचे दिग्दर्शक जयंता माधाब दत्ता यांनी सांगितले.
दुर्गम भागात प्रथमच आयोजन पाहिले : प्रेमेंद्रा मुजुमदार
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, महोत्सवाचे सल्लागार प्रेमेंद्रा मुजुमदार यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन भातशेतीत केल्याचा हा आपला पहिलाच अनुभव आहे. कडब्यापासून निर्मित ऑडिटोरियमदेखील आपण प्रथमच पाहत आहोत. महोत्सवादरम्यान येथील स्थानिक पदार्थ जेवणात देण्यात आले होते.

No comments:
Post a Comment