व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 16 December 2017

दहशतवाद्यांवर कारवाई करा, अन्यथा नियंत्रण गमावाल! पाकिस्‍तानला अमेरिकेचा इशारा


वॉशिंग्टन- पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून मोठा धोका आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यात यश आले नाही तर भूमीवरील नियंत्रण गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा अमेरिकेने शुक्रवारी दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रॅक्स टिलर्सन यांनी दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर थिंक टँकला दिलेल्या सल्ल्यामध्ये या मुद्द्याला नमूद करण्यात आले आहे, असा दावा ‘डॉन’ ने केला आहे.

टिलर्सन म्हणाले, दहशतवाद काबूल नंतर इस्लामाबादला लक्ष्य करू शकते. अमेरिकेच्या बदललेल्या रणनीति अंतर्गत अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दहशतवादी पाकिस्तानला सहजपणे आपले लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या आणखीनच वाढत चालली आहे. काही दिवसांनंतर दहशतवादी पाकिस्तानला लक्ष्य करतील. दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत आम्ही पाकिस्तानला सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु सुरुवात पाकिस्तानने केली पाहिजे. त्याचे परिणामदेखील दिसून यायला हवेत, असे टिलर्सन यांनी म्हटले आहे
१९७१ च्या नरसंहाराबद्दल बांगलादेशशी पाकिस्तानने माफी मागावी : मुहाजिर काँग्रेस
१९७१ च्या नरसंहाराला जबाबदार असलेल्या पाकिस्तानने बांगलादेशची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी वर्ल्ड मुहाजिर काँग्रेसने केली आहे. अमेरिकेत पाकिस्तानच्या राजदूत कार्यालयाकडे ही मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशात नाइलाजाने राहणाऱ्या पाकिस्तानींना त्यांचा सन्मान देत मायदेशी बोलवावे, अशी मागणीही संघटनेने केली.
पाकच्या लष्करानेच अफगाणमध्ये पसरवली अशांती : हक्कानी
अमेरिकेत पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी हुसेन हक्कानी यांनी देशाच्या लष्कराच्या विरोधातच गंभीर आरोप केले आहेत. हक्कानी म्हणाले, अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या लष्करानेच अशांती निर्माण केली आहे आणि हेच लष्कर आता शांतता प्रस्थापित करण्याचे नाटक करत आहे. खरे पाकिस्तानी सैन्य एकीकडे तालिबानला पोसते आणि दुसरीकडे मात्र दहशतवाद्यांच्या विरोधात अमेरिकेला सहकार्य मागत आहे. आग लावून नंतर ती विझवण्याचे कामही पाकिस्तानचे सैन्य करत आहे. हीच खरी समस्या आहे, असा आरोप हक्कानी यांनी केला आहे. शीतयुद्धा दरम्यान पाकिस्तान एक चांगला सहकारी होता. परंतु भारतासोबत संघर्ष करण्याचे पाकिस्तानच्या मनसुब्यांशी अमेरिकेला देणेघेणे नाही. खरे तर अमेरिका व पाकिस्तानचे हितसंबंध कोठेही जुळत नाहीत. अमेरिकेला हे क्षेत्र सोडून जायचे आहे. अफगाणिस्तानाची धुरा बळकट सरकारकडे सोपवून अमेरिकेला आपले सैन्य माघारी बोलवायचे आहे. त्यांना आता रोज तालिबानींशी मुकाबल्याची इच्छा नाही.

No comments:

Post a Comment