व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 6 December 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*


 संभाजीनगर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 6 डिसेंबर रोजी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मानवंदना अर्पण करण्यात आली. सामाजिक न्याय, समता आणि प्रगत भारताच्या उभारणीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या अद्वितीय कार्याची उजळणी करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या स्मारकास आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दलित, वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी सतत शिवसेना काम करत असल्याचे खैरे म्हणाले. 



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही त्यांची शिकवण आमच्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे दानवे म्हणाले. 


या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, अनुयायी आणि शिवसैनिकांनी सहभाग नोंदवून डॉ.आंबेडकरांना अभिवादन केले.



याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, महानगरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व शहर संघटक सुनीता सोनवणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment