लोहा दि : देशातील अश्व बजारासाठी प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील खंडोबारायाची माळेगाव यात्रा १८ डिसेंबर पासून सुरू होत आहे . आता ही यात्रा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे.व्यापारी छोटे दुकानदार यात्रेत यायला सुरुवात झाली आहे पण पाणी तसेच विद्युत जोडणी अध्याप झाली नाही त्यामुळे यात्रेकरू त्रस्त झाले आहेत
यात्रेसाठी डीपीडिसी मधून पाच कोटी रुपये द्यावेत अशी मागणी आ चिखलीकर यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
माळेगाव यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे परंतु या ठिकाणी अद्यापही जिल्हा परिषद वतीने सुविधां उपलब्ध करून दिल्या नाहीत.
पाणी पुरवठा, वीज जोडणी
केले नाही त्यामुळे माळेगाव यात्रेस दूरवरून दाखल झाले छोटे मोठे व्यापारी पाणी व वीज पुरवठ्या अभावी त्रस्त आहेत.
यात्रेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषद यांच्याकडे आहे. यात्रेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी निधीची तरतूदही करण्यात येते परंतु अध्याप पाण्याची व्यवस्था नाही , वीज जोडणी नाही.
अंतर्गत रस्ते दुरुस्ती व सपाटीकरण केलेले नाही. त्यामुळे यात्रा अधिक दर्जेदार व्हावी , भाविकांना , यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी येथे सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
र यांची मागणी
No comments:
Post a Comment