व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 10 December 2025

श्री गुरु तेग बहादर साहिब जी महाराज यांच्या ३५० व्या शहीदी गुरप्रबनिमित्त सरकारकडून साजरा केला जाणारा

श्री गुरु तेग बहादर साहिब जी महाराज यांच्या ३५० व्या शहीदी गुरप्रबनिमित्त सरकारकडून साजरा केला जाणारा "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर" उत्सव नागपूरहून सुरू झाला - डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.) प्रशासक, गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड.

दिनांक ०८ डिसेंबर २०२५ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी महाराज यांच्या ३५० व्या शहीदीला समर्पित भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली, "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर" नावाचा शहीदी शताब्दी उत्सव साजरा केला जात आहे. ह्या कार्यक्रमाची सुरुवात ०७ डिसेंबर रोजी नागपूर येथून झाली. या कार्यक्रमात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.) अध्यक्ष, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर शहीदी समागम आणि प्रशासक, गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड यांना कार्यक्रम यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल, मोठ्या प्रमाणावर साजरा केल्याबद्दल आणि संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल विशेष सन्मान देण्यात आले. यावेळी श्री गुरु ग्रंथ साहिब जी महाराज यांचा प्रकाश असून गुरबानी कीर्तन व गुरुमत विचारांची चर्चा पूर्ण भक्तिभावाने करण्यात आली. यावेळी श्री नितीन गडकरी जी, परिवहन मंत्री, भारत सरकार, श्रीमती माधुरी मिसाल जी, राज्यमंत्री, श्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र, श्री माणिकराव कोकाटे जी, अल्पसंख्याक मंत्री, श्री आशिष जैस्वाल जी, नियोजन मंत्री, श्री गिरीश महाजन जी, जलसंपदा मंत्री, श्री रामेश्वर नाईक जी, नियोजक, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहाद्दर जी समागम, संत बाबा हरनाम सिंघ जी, जत्थेदार दमदमी टकसाल, संत बाबा बलविंदर सिंघ जी, कार सेवावाले, लंगर साहिब, मुख्य प्रशासक साहेबांचे सल्लागार स. जसवंत सिंघ बॉबी, भाई सुखविंदर सिंघ कथावाचक, श्री विपिन इटनकर, जिल्हाधिकारी नागपूर यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे मान्यवर व मंत्री उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देखरेख आणि मदतीसाठी प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या आदेशानुसार गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका विशेष पथकाने सहभाग घेतला  अधिक्षक, गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड.

No comments:

Post a Comment