नांदेड - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा निरोगी शरीर, शांत मन, आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असून ब्रम्ह बाबा च्या कृपेने हे ऊर्जा स्थान शक्ती स्थान लाभले आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, वसंतनगर केंद्राच्या वतीने आयुष मंत्रालय भारत सरकार सहयोगाने अन्तर्राष्ट्रीय योग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी वसंतनगर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी स्वाती जी दिदी, ज्येष्ठ नेते माधवराव पाटील शेळगावकर, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,धोंडू पाटील, विजय होकर्णे हे उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्या सुद्धा ब्रह्माकुमारी परिवाराच्या सदस्या आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या परिवार सोबत जोडले गेले आहेत असे सांगून ना बोर्डीकर म्हणाल्या की सद्या मानसिक ताण तणाव वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी मन शांती ची गरज आहे यासाठी ब्रह्मकुमरिज केंद्रामार्फत उत्तम कार्य केले जाते.
ब्रह्मकुमारी चळवळीचा हेतू म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि अभ्यासाद्वारे मानवांना सक्षम बनविणे जेणेकरून ते त्यांचे जीवन सुधारू शकतील आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील असे राजयोगिनी ब्रह्मकुमारी स्वाती दिदी म्हणाल्या. प्रारंभी राजयोगिनी ब्रह्मकुमारी स्वाती दिदी यांच्या हस्ते राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान इंगोले (कृषि भूषण),राजेंद्र मड्डी, एडवोकेट नांदेड़कर, रमाकांत भाई,भानुदास पेंडकर, वृक्ष मित्र संतोष मुगटकर, वंदना बहन जी, अनिता बहन जी, सत्य बहन जी, मीणा बहन जी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कल्पना मैडम यांनी आणि आभार प्रदर्शन विजय होकर्णे यांनी केले.
No comments:
Post a Comment