व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 25 June 2025

नांदेड महानगरपालिका विकास आराखडा बाबत उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..

**

*नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका शहराचा पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करून प्राधिकरण करण्याकरिता बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री,नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते ना.हेमंतभाऊ पाटील व आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केली होती*..
त्यानुसार *आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजित केले होते*..
याबैठकीत नांदेड शहर व परिसराचा पुढील 25 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना.शिंदे साहेब यांनी दिले. या शहराचा सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली तसे हद्दवाढ व प्राधिकरणाच्या विषयी उपमुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला.

या बैठकीस उपस्थित पालकमंत्री ना.अतुलजी सावे साहेब,मा.मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण,माझे नेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते ना.हेमंतभाऊ पाटील,नांदेड लोकसभा खासदार रविंद्रजी चव्हाण,राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे,आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,मा.आमदार अमरनाथ राजूरकर,मा.खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,नगरविकास विभागाने प्रधान सचिव गोविंदराज,एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रमकुमार,नांदेड जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले,महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते...


No comments:

Post a Comment