व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 30 June 2025

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्यावतीने पाऊस दिंडी


मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या  यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे घातले असून २५ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां व सिड बॉल टाकण्यात आले . रस्त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा मन की बात  हा कार्यक्रम सर्वांनी ऐकला.*

रविवारी सकाळी ६ वाजता भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या हस्ते अमरनाथ यात्री संघ,भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाऊस दिंडीला भगवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी अरविंद भारतीया, शितल भालके, राजू सुरतवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजन करण्यात आले होते. बालाजी मंदिर चे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे शेगावची कचोरी व चहाचे वाटप करण्यात आले.बालाजी मंदिर तर्फे निर्मला व पद्माकर केंद्रे,वसुबेन व जयंतीलाल पटेल, वंदना व दुलाजी सुर्यवंशी, सुनीता व सुनील व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला. ध्वनिक्षेपक असलेला रथ व ढोल ताशाच्या गजरात यात्रेकरूंनी मार्गक्रमण सुरू केले. श्रीराम मंदिर लातूर फाटा नांदेड येथे पवन गुरुखुदे, नामदेव पांचाळ, संजय जाधव, लक्ष्मीकांत गोनारकर यांनी अल्पोहापराचे वाटप केले . विजया व दत्ता खानझोडे,छाया व उद्धव केंद्रे, गिता व दत्ता पावडे यांचा शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.शैलेश गट्टानी, आनंद माहुरे, संकेत गिरी यांच्यातर्फे पाऊस दिंडीत सामील झालेल्या सर्वांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. विश्वेश्वर महादेव चारिटेबल ट्रस्ट तर्फे सुप्रिया व सुरेश कुलकर्णी,ज्योती व विनायक किन्होळकर,चित्ररेखा व नारायण पांडे यांचा सन्मान करण्यात आला.

विष्णुपुरी येथे दिंडी पोहोचली असता भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने प्राचार्य सुनील हंबर्डे, विश्वनाथ स्वामी,संतोष कदम यांनी सर्वांना अल्पोहार वाटप केले. यावेळी सुभाष देवकत्ते, साईप्रसाद  हळदे, राधा  घुगे,सुरेखा मुंढे, माधव बामणे, जयप्रकाश येवले यांच्या सह सर्वांचे 
जंगी स्वागत केले. रस्त्यामध्ये नानकसर गुरुद्वाराचे दर्शन घेऊन सुनिता जैन,अमरसिंह चौहान ,सुरेश शर्मा, 
शार्दूल,रूपाली व शैलेंद्र वडजकर यांनी अरदास केली . झरी येथे सचिन माधवराव पाटील यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे स्वादिष्ट पोहे व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळचे अकरा वाजले होते. त्यामुळे झरीच्या कॉलेजच्या सभागृहात मन की बात हा कार्यक्रम सर्वांनी रेडिओवर ऐकला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गंगाधर पवार, संगिता व किरण राजे, शारदा व विजय वाईकर, दिगा पाटील हे उपस्थित होते. 

रत्नेश्वरी गड चढण्यास सुरुवात करण्यापूर्वी सारिका केंद्रे, ज्योती व रामेश्वर वाघमारे व यांनी सर्वांना उसाचा रस पाजल्यामुळे नवीन ऊर्जा मिळाली. गडावर चढत असताना यात्रेकरूंनी आपल्या सोबत आणलेले जांभूळ, सिताफळ, लिंबोळी,कोयी यासह इतर बिया जागोजागी पेरल्या. दीपक मोरतळे यांच्या पुढाकारातून ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी तय्यार केलेले शेकडो सीड बॉल सर्वत्र टाकले.तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये केलेल्या आवाहनानुसार  सुजाता व सुधीर अंबेकर आशा पल्लेवार, कविता गरुडकर, व्यंकटेश जामकर या सर्वांनी स्वतःच्या आईच्या नावाने एकेक झाड लावले. दररोजचा पायी चालण्याचा सराव असल्यामुळे यात्रेकरूंनी १८ किमी चे अंतर  सहजच पूर्ण केले. जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते रत्नेश्वरी मातेची आरती करण्यात आली. मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सर्वांनी रत्नेश्वरी मातेला साकडे घातले.अन्नपूर्णा  मंदिरात आरती झाल्यानंतर मंदिराच्या अध्यक्षा सुषमा विजयसिंह गहेरवार, हभप रामराव राऊत महाराज, शोभा गुरुसिंग चव्हाण, जयश्री जयस्वाल यांच्या हस्ते ज्योती व सुधीर व शिवणीकर, सुनीता व संजय कलकोटे,कल्पना व अजय संगेवार, 
सुनिता व सुधाकर केंद्रे यांचा सन्मान करण्यात आला. अमरनाथ यात्रेत प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी राम रत्नपारखे अहमदपूर यांनी सर्वांना स्टीलची ताटे दिली. अरुणा व दिगांबर गिरी,अनिता बालाजी ढाकणे,
विशाल पवार, विमल व गोदावरी चव्हाण यांनी भजने म्हटली.अन्नपूर्णा मंदिरातर्फे तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेस ची  व्यवस्था करण्यात आली होती. आली. पाऊस दिंडी यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष बच्चेवार, प्रकाश इंदूरकर, विजय अटकूरकर, भगवान अडसूळे, साईनाथ भोसले,संतोष भारती यांनी परिश्रम घेतले.गेल्या २५ वर्षापासून सातत्याने बियाचे रोपण करत असल्यामुळे नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर तसेच गडावर मोठ्या प्रमाणात झाडे  लागल्यामुळे दिलीप ठाकूर व  अमरनाथ यात्रेकरूंचे  सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment