दि. 01 जानेवारी 2025 रोजी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे माळेगाव दर्शनासाठी नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी बेरळी ता.लोहा येथिल मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या अवघ्या 17 वर्षीय सुमित ढेंबरे यांच्या घरी भेट देऊन, त्या कुटुंबाला उघड्यावर पडू देऊ नका सर्वांनी मिळून ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला करण्यात आले होते, त्याच अनुषंगाने जरांगे पाटलांनी तात्काळ फोन वरून राज्याचे विद्यमान मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील(अहमदपूर)व राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान राज्यसभा खासदार मा.श्री अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला व तुमच्या एवढ्या शाळा, शिक्षण संस्था आहेत,तुम्हाला आज पर्यंत समाजाने खुप उंचीवर नेऊन ठेवलंय आता समाजाच्या पाठीशी आपली थोडी शक्ती लावा या कुटुंबातील लेकरा बाळांच्या शिक्षनाला हातभार लावा असं म्हणताच दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ होकार दिला व जी काही लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला होता त्याची पूर्तता करण्यासाठी आज आत्महत्याग्रस्त कुटुंबाला बेरळी येथे जाऊन भेट घेत त्यांच्या परिवाराची विचारपूस करून लेकराचं शिक्षण,राहण्यासाठी घर व आरोग्याच्या दृष्टीने सखोल अशी चर्चा करण्यात आली व लागलीच उद्यापासून मदत करण्यास सुरुवात करा असे आदेश त्यांच्या सहकार्यांना दिले.
दुःखात असणाऱ्या कुटुंबाला सावरण्याच्या आधाराची अशा पल्लवीत झाल्यामुळे त्यांनी जरांगे पाटलांचे आभार व्यक्त केले.
धन्य ते जरांगे पाटील त्यांनी राज्यभरात अशा कित्येक कुटुंबाचा आधार बनुन जगण्याची उमीद देत आहेत.
यावेळी गावातील तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment