नांदेड. परभणी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेने जिल्हाध्यक्ष प्रा राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन सेनेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सोनसळे, माधवदादा जमदाडे, राहुल चिखलीकर, रुपेश सोनसळे, माधव चित्ते, प्रतीक मोरे, मधुकर झगडे, संदीप मांजरमकर, प्रशांत गोडबोले, काका डावरे, विलास असले, के एच वने, भारत भालेराव, सावळे सर, अमर जोंधळे, बाळू डोणे, संकेत सोनकांबळे, अमर वाघमारे, अविनाश गायकवाड, महेश पंडित, सागर गायकवाड, टिंकू खंडागळे, गौतम नगर येथील महिला मंडळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
परभणीत गेल्या दोन दिवसांपूर्वी संविधान विरोधी विचारसरणीच्या माथेफिरू कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्य प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. जाणीवपूर्वक महामानवाचा अवमान करण्याचा कट सनातन्यांकडून वारंवार रचला जात आहे. ज्या संविधानाच्या बळावर देशातली लोकशाही टिकून आहे त्याच संविधानाला मूठमाती देऊन हुकूमशाही लागू करण्याचा डाव इथल्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता जनतेनेच पुढाकार घेण्यात ची गरज असल्याचे मत प्रा. राजू सोनसळे यांनी यावेळी व्यक्त केले.
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली . यावेळी ते बोलत होते . ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच भारताला तारू शकेल त्यामुळे संविधानाचा आदर करायला शिका अन्यथा येणारा कठीण असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे



No comments:
Post a Comment