व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 5 December 2024

मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभियान सुरु

मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी नांदेड शहरात सह्यांची मोहिम सुरू केली असून कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ सुरवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
नांदेड शहरातील वजिराबाद भागातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव डॉ श्रावण रॅपनवाड, सहसचिव श्याम दरक, सरचिटणीस केदार सोळंके, राजेश पावडे, प्रफुल्ल सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ रेखा चव्हाण, शहराध्यक्ष डॉ करुणा जमदाडे, माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य टेन्ट टाकून काँग्रेस पक्षाच्या वतीने हि मोहीम राबविण्यात आली. यावेळी नांदेड शहरातील असंख्य नागरीकांनी या मोहिमेस उत्सुर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात जवळपास १ हजार महिला व पुरुषांनी स्वाक्षरी करुन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी कार्याध्यक्ष महेश देशमुख, सतिश देशमुख, सत्यपाल सावंत, गगन यादव उपाध्यक्ष संजय वाघमारे, दिपकसिंघ हुजुरीया, तालुका अध्यक्ष निरंजन पावडे, अब्दुल मोहित, रिजवान कुरेशी, अजिज कुरेशी, यांच्या सह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते 

No comments:

Post a Comment