व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 26 December 2024

नांदेडकरांना मूलभूत सुविधा पुरवा : आ. बोंढारकर यांच्या महानगरपालिका प्रशासनाला सूचना

 नांदेड : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवून नागरी समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी नियोजन करा अशा सूचना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी आज दिल्या. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह महानगरपालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची त्यांनी आज आढावा बैठक घेतली . या बैठकीत ते बोलत होते. 
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी आज पहिल्यांदाच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली . या बैठकीत नांदेड शहरातील स्वच्छता , प्रलंबित विकास कामे , दिवाबत्ती , वाहतूक ,  पाणीपुरवठा , घरकुल , रस्ते , नाली , दवाखाना , शाळा या संदर्भातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला.  नांदेड शहरात असलेल्या वाहतुकीच्या अनुषंगाने त्यांनी महत्त्वपूर्ण लक्ष वेधले तर याच वेळी शहरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.  शहरातील कोणत्याही भागांमध्ये अस्वच्छता दिसल्यास संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खैर केली जाणार नाही असा इशारा आ. बोंढारकर यांनी दिला आहे.  शहरातील सर्वच भागात पाणी पुरवठ्याचे नियोजन करा. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे. कोणत्या भागात पाणी टंचाईचा प्रश्न  निर्माण होणार नाही या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आ. बोंढारकर यांनी दिल्या आहेत .शहरातील रस्ते विकासाची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना प्रवासासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी सुचित केले.  महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी ही काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना देत महानगरपालिकेच्या रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्री पुरवण्याचे अनुषंगाने आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करू मात्र त्यासाठी मनपा प्रशासनाने आपल्या जे जे हवे त्याची माहिती द्यावी असे निर्देशही यावेळी आ. बोंढारकर  यांनी दिले आहेत . यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम , उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्यासह महानगरपालिकेतील सर्वच विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे,शहरप्रमुख सुहास खराणे पाटील,श्याम पाटील वानखेडे यांच्यासह आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
चौकट 
गुंठेवारीला मुदतवाढ द्या. 
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुंठेवारीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी आ. बोंढारकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.  गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करणाऱ्या मालमत्ताधारकांना प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे अशी अपेक्षाही आ. बोंढारकर यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment