व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 24 November 2024

नवनिर्वाचित खासदार रविंद्र चव्हाण यांच्या विजयाचा तरोड्यात महाविकास आघाडीकडून जल्लोष.

 


..

नांदेड- 

   नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक २,तरोडा (बु.) मध्ये नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व नांदेड उत्तर विधानसभाप्रमुख महेश देशमुख तरोडेकर यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतीषबाजीसह एकमेकांना पेढे भरवून महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला.

गत कांही महिन्यापूर्वीच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या विजयात तरोड्यातून महत्वपूर्ण योगदान दिले होते.परंतू,त्यांच्या अकाली निधनानंतर नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणूकीत काॅग्रेसने त्यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.त्यांना मताधिक्य देऊन त्यांच्याही विजयासाठी निष्ठापूर्वक व निस्वार्थपणे  परिश्रम घेतलेल्या तरोड्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मूळ गांव तरोडा (बु.),चैतन्यनगर व अनेक उपनगरांमध्ये आनंदोत्सव साजरा केला व त्यानंतर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज त्यांना भेटून अभिनंदनासह यथोचित सत्कार केला.

 यावेळी युवक काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव देशमुख तरोडेकर,राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,महिला काॅग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा वैद्य,वसंत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा सरचिटणीस व पक्षाचे प्रभाग अध्यक्ष अमितकुमार कांबळे, काॅग्रेसच्या अनु.जाती विभागाचे रत्नाकर जोंधळे,संजय वाघमारे, सोशल मिडीयाचे धनंजय उमरीकर,लोकेश कावळे, प्रथमेश देशमुख,अंकुश पवार, धनंजय कल्याणकर,मारोती घोडके,गजानन मुळे,महेश मिसे,सोनू देशमुख,अन्वर अहेमद, कलीम शेख,शेख असलम,शेख युनुस,शेख नासेर,शेख दाऊद, शिवराज कांबळे,गौतम शिरसाठ,वैभव गायकवाड, रमाकांत चौधरी,सय्यद वजीर आदींसह शेकडो महिला,युवक व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment