नांदेड- नानक साई फाऊंडेशन ची १० वी संत नामदेव घुमान यात्रा पंजाब हिमाचल हरियाणा दौऱ्यावरून आज सोमवार २५ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतणार आहे.
पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नानक साई फाऊंडेशन च्या घुमान यात्रेच्या माध्यमातून पंजाब -हरियाणा -हिमाचल प्रदेश मधील धार्मिक ऐतिासिक स्थळांचे दर्शन-इतिहास -संस्कृती सोबत पर्यटनाचे अनोखे कॉम्बिनेशन मराठी माणसांना मनापासून आवडले आहे.. नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्र सिंघ जी व संत बाबा बलविंदर सिंघ जी यांच्या आशीर्वादाने ही यात्रा आयोजित केली जाते. नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख त्तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व सौ प्रफुल्ला बोकारे यांच्या मार्गर्शनाखाली ही यात्रा आयोजित केलेली आहे. संत नामदेव महाराज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून आयोजित केली जाते. माता नैना देवी, अमृतसर साहिब,आनंदपूर साहिब,संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी घुमान, गोविंदवाल साहिब,अमृतसर साहिब येथे जाऊन दर्शन घेतले.. अमृतसर येथील हरमंदिर मध्ये यात्रेकरूनी श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. १२५ यात्रेकरू सहभागी झाले आहेत.. घुमान यात्रा पंजाब हिमाचल हरियाणा दौऱ्यावरून आज सोमवार २५ नोव्हेंबर रोजी हम सफर एक्सप्रेस ने सायंकाळी ४ वाजता नांदेड येथे परतणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशन चे संयुक्त सचिव श्रेयस कुमार बोकारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment