नांदेड- महालक्ष्मीचा सण पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . गौराईची स्थापना करत पूजा अर्चा केली जाते. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मात्र येईलवाड कुटुंबीयांनी मात्र आपल्या तीन्ही सुनांचं गौरी म्हणून त्यांचं पूजन करून खरी लक्ष्मी ही सुनच असते, असा संदेश दिला आहे. कंधार तालुक्याती येईलवाड दांम्पत्य हे दरवर्षी आपल्या तीन्ही सुनांना ज्येष्ठा, गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांची पूजन करून महालक्षम्याचं सण साजरा करत असतात. यंदा ही परंपरा कायम ठेवली आहे. हा अनोखा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी केली होती. या गौरी सोहळ्यामधून सासू आणि सुनांमधील प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, असा आपला उद्देश असल्याचं येईलवाड यांनी सांगितले.
बाईट - रामचंद्र येईलवाड
No comments:
Post a Comment