#नांदेड तालुक्यातील #नेरली येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांना कॉलराची लागण झाली आहे. या रुग्णांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेरली येथे अजूनही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहा आरोग्य पथके कार्यरत आहेत.
याबाबत विविध रुग्णालयात, भेट देऊन रुग्णांची विचारपूस करून धीर दिला तसेच डॉक्टरांना योग्य तो उपचार देण्याचे आदेश दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख, मंडळ अध्यक्ष सुनील राणे, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य गुरुमीतसिंघ महाजन, आनंद पावडे, संदीप पावडे, व्यंकटेश जिंदम, सुरेश लोट, डॉक्टर हनुमंत मुजुळेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment