हिंदू विरशैव लिंगायत मंचाच्या अनेक मागण्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता.
लिंगायत समाजाच्या विदयार्थ्यांसाठी नवी मुंबई आणि पुण्यात वसतिगृहासाठी शासन देणार जागा.
हिंदू वीरशैव लिंगायत मंच' या नावाने आपण महाराष्ट्रात संघटन करतो.
समाजबांधवांना एका सूत्रात बांधून समाजोन्नतीचा आणि राष्ट्रोन्नतीचा विचार करताना समाजविघातक शक्तींचा जोरकसपणे विरोध करणे हे आपल्या मंचाचे काम आहे.
हे एक व्यापक व्यासपीठ असून या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आहे.
जे जे समाजहिताचे आहे, त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे.
या मंचावर विचारांचे आदानप्रदान, संवाद अपेक्षित आहे.
वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जी विद्या शिव म्हणजे लिंग आणि जीव म्हणजे अंग यांच्या ऐक्याचे ज्ञान करून देणारी आहे, त्या विद्येत जे शैव लोक रमतात, ते वीरशैव होत. भगवान शंकराचे कट्टर उपासक असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या पुनरुत्थानाचे युगप्रवर्तक कार्य केले ते बसवेश्वरांनी. म्हणूनच त्यांना या पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच वीरशैव मत संस्थापित करणाऱ्या जगद्गुरू पंचाचार्यांनाही या पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक हिंदू देवदेवतांच्या मस्तकावर, शरीरावर धारण केले गेलेले शिवलिंग हे वीरशैव आणि हिंदू तत्त्वज्ञानांच्या एकरूपतेचे प्रतीक आहे. खोलात जाऊन धांडोळा घेतला, तर एकरूपतेच्या अशा अनेक खुणा आढळून येतात.
या मंचाच्या माध्यमातून तोच विचार अधोरेखित करत आहोत. वीरशैव लिंगायत हा समाज हिंदू धर्माचा अविभक्त घटक आहे, हे विविध मुद्द्यांच्या आधारे मांडणारी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा खा. डॉ. अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात दि. ५ सप्टेंबर रोजी भक्तीस्थळ, श्रीक्षेत्र राजुर (अहमदपूर) येथून आरंभ झाली. या यात्रेच्या माध्यमातून विरशैव लिंगायत पंथाला अनुसरणारे आणि अन्य हिंदूधर्मीय यांच्यात सुसंवादाचा दुवा साधला जात आहे. आपण सर्वच जण व्यापक, सर्वसमावेशक अशा हिंदू धर्माचेच वैशिष्ट्यपूर्ण घटक आहोत ही जाणीव जनमानसात रुजवत, या यात्रेची सांगता आपल्या प्रमुख उपस्थितीत शक्तीस्थळ 'मंगळवेढा' येथे व्हावी, असा आमचा मानस आहे.
आज समाज तोडणारे लोक आक्रमक पवित्रा घेऊन चुकीच्या गोष्टी समाजाच्या माथी मारत असताना समाजप्रबोधनाच्या माध्यमातून आपण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सन्मान यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व जण समाजहित, धर्महित आणि राष्ट्रहित यांना प्राधान्य देऊया आणि आपली सनातन परंपरा अधोरेखित करत संघटितपणे पुढील आव्हानांचा सामना करू या.
आमची ही प्रगल्भ व प्रगतीशील समाज उभाराणीची उद्दिष्टे पूर्ण होण्यास आपले मार्गदर्शन तथा नेतृत्व सहाय्यक व प्रेरक ठरेल; या विश्वासासह आपणास हिंदु वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे.
१. हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत असा दाखला असणा-या सर्व जातींना इतर मागासवर्गीय (OBC) दर्जा देण्यात यावा. ज्या पोटजातींना मागास प्रवर्गात आरक्षण आहे ते कायम ठेवावे.
२. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळावर त्वरित अधिकारी व सदस्यांची नियुक्ती करून महामंडळ प्रभावीपणे कार्यान्वयीत करावे.
२.१ केवळ मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांसाठीच हे महामंडळ न राहता, सर्वच वीरशैव लिंगायत प्राधान्याने आर्थिक दुर्बल समाज बांधवांना याचा सहज व त्वरित लाभ मिळेल अशी नियमावली नव्याने करून यातील जाचक अटी व पोर्टल वारंवार स्थागित होणे; अश्या तांत्रिक अडचणी त्वरित दुर करून त्याचा होतकरू युवक, महिला, विविध बचत गट यांना खरोखर लाभ होईल अशी रचना असावी.
२.२ सध्या दिलेल्या पन्नास कोटी रुपयांचा सदर महामंडळाचा निधी समाजाच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत तोकडा आहे. तो 'एक हजार कोटी' रुपये एवढा उपलब्ध करावा.
३. हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या अनेक स्मशानभूमीवर विघातक शक्तींनी ठिकठिकाणी अतिक्रमण केली आहेत. ती त्वरित मोकळी करून द्यावीत.
३.१ हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या अनेक स्मशानभूमीच्या जागा / भूखंडांना शासकीय निधीतून त्वरित संरक्षक भिंती उभारून रक्षण करावे.
३.२ हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या जनसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
४. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात जगदज्योती महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रांची स्थापना करावी व त्यासाठी आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
५. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, यवतमाळ, संभाजीनगर, लातूर, नांदेड या शैक्षणिक शहरात विद्यार्थी वसतीगृहांसाठी जागा, इमारत, व आवश्यक सुविधासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. (आठरापगड जातीचा हा समाज असल्याने अनेक वंचित, आर्थिक मागास घटकांसाठी या शैक्षणिक - शिक्षण पूरक सुविधेची अत्यंत गरज आहे.)
६. हिंदु वीरशैव-लिंगायत समाजासाठी जनसंख्यानिहाय प्रत्येक जिल्हयात किमान एक 'वीरशैव सदन' (सभागृह व पूरक सुविधा) यासाठी जागा व इमारत निधी उपलब्ध करून द्यावा.
७. स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी अमान्य करून, संविधांनानुसार हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाला न्याय, सन्मान व प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध होईल अशी योजना करावी.
' हिंदू विरशैव लिंगायत मंच '
१. प. पू. वीरूपाक्ष शिवाचार्य पांचक्षर शिवाचार्य महास्वामीजी - श्री मन्मथ मठ, श्रीक्षेत्र कपिलधार, अध्यक्ष - विरशैव लिंगायत शिवाचार्य सभा
२. प. पू. ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर - सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर.
३. महादेव शिवाचार्य गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज. - सचिव - विरशैव लिंगायत शिवाचार्य सभा
४. आ. सचिनजी कल्याणशेट्टी - अक्कलकोट - सोलापूर भा. ज. प. - जिल्हाध्यक्ष
५. खा. डॉ. अजीतजी गोपछडे. - राज्यसभा सदस्य, - नांदेड
६. मा. बसवराजजी पाटील मुरूमकर - माजी मंत्री, म. रा. - धाराशिव
७. डॉ. सौ. अर्चनाताई शै. पाटील चाकूरकर. - भा. ज. प. लातूर
८. डॉ. रविंद्र आरळी. - भा. ज. प. - सांगली
९. श्री. श्रावण राजेंद्र जंगम. राष्ट्रीय अध्यक्ष - जंगम संघटना. -पुणे
१०. श्री. अण्णाराय बिरादार. - हिंदू वीरशैव लिंगायत मंच पिंपरी - चिंचवड
११. श्री. हेमंत परशुराम हरहरे. - हिंदू वीरशैव लिंगायत मंच -पुणे
१२. श्री. गुरुराज चरंतिमठ. - हिंदू वीरशैव लिंगायत मंच - पुणे
१३. श्री. नितीन शेटे. - हिंदू वीरशैव लिंगायत मंच, - देवगिरी प्रांत
१४. डॉ. राजेंद्र हिरेमठ. पुणे
१५. श्री. तेजस महाजन - प्रचार - प्रसार प्रमुख हिंदू वीरशैव लिंगायत मंच
यांसह सर्वश्री गोविंदराव माखणे, गुरुनाथ मगे, प्रेरणाताई होनराव, ऍड. संभाजीराव पाटील, बसवराज पाटील कौळखेडकर, श्रीरंग महाराज औसेकर, कपिलदादा माखणे, बालाजी पाटील चाकूरकर, अमोल निडवदे, मेघराज भरबडे, यांनी या बैठकीत समाज्याच्या वतीने लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
No comments:
Post a Comment